किमान तापमान : 23.35° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.35° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.63°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलभोपाळ, २० फेब्रुवारी – मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चव्हाण यांनी होशंगाबादचे नाव बदलून नर्मदापुरम् करण्याची घोषणा केली असून, याबाबतचा अधिकृत प्रस्ताव आता केंद्राकडे पाठविण्यात येईल, असे ते म्हणाले.
नर्मदा जयंतीनिमित्त होशंगाबाद येथे आयोजित एका कार्यक्रमात त्यांनी याबाबत सूतोवाच केले. कार्यक्रमादरम्यान होशंगाबादचे नाव बदलून नर्मदापुरम् करायचे, असा प्रश्न त्यांनी उपस्थितांना विचारला असता, त्यावर जनतेने एकमुखाने सहमती दर्शविली. यावेळी राज्य सरकार नर्मदा काठावर सिमेंट कॉंक्रीटच्या संरचना बांधायला परवानगी देणार नाही, असे त्यांनी जनतेला आश्वस्त केले. मध्यप्रदेश विधानसभेचे हंगामी अध्यक्ष रामेश्वर शर्मा आणि खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी होशंगाबादचे नाव बदलण्याची मागणी लावून धरली होती. कुठवर लुटारू हुशंगशहाच्या नावाने या शहराला कलंकित करायचे; ज्यांनी आमचे मठ-मंदिर तोडले, भोजपूर येथील महादेवाच्या मंदिराची विटंबना केली त्याचे नाव या शहराला नको. मोक्षदायिनी नर्मदा मातेच्या आशीर्वादाने पुण्य मिळते, तिच्यामुळेच इथे शेती पिकते, समृद्धी नांदते, तिच्याच नावाने हे शहर ओळखले जावे, असे या दोन नेत्यांचे म्हणणे होते. शर्मा यांनी मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावर आनंद व्यक्त केला असून, फटाके फोडून आनंद साजरा केला.