|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 7:02 ए एम | सूर्यास्त : 6:18 पी एम
हवामान

किमान तापमान : 23.22° से.

कमाल तापमान : 23.68° से.

तापमान विवरण : broken clouds

आद्रता : 53 %

वायू वेग : 6.13 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

23.22° से.

हवामानाचा अंदाज

22.99°से. - 26.27°से.

शुक्रवार, 24 जानेवारी टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

23.33°से. - 26.99°से.

शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.18°से. - 27.4°से.

रविवार, 26 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.53°से. - 27.91°से.

सोमवार, 27 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.66°से. - 27.88°से.

मंगळवार, 28 जानेवारी घनघोर बादल
हवामानाचा अंदाज

25.01°से. - 27.35°से.

बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादल
Home » उत्तर प्रदेश, राज्य » अयोध्या विकासासाठी १४० कोटी

अयोध्या विकासासाठी १४० कोटी

योगी आदित्यनाथ सरकारचा अंतिम अर्थसंकल्प सादर,
लखनौ, २२ फेब्रुवारी – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने आज सोमवारी आपल्या कारकीर्दीतील पाचवा व शेवटचा अर्थसंकल्प सादर केला. यात अयोध्येतील राममंदिर परिसराच्या विकासासाठी वअन्य सुविधांसाठी सुमारे १४० कोटी रुपयांचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. राजधानी लखनौमध्ये राष्ट्रीय प्रेरणास्थळाच्या निर्मितीसाठी ५० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.
आदित्यनाथ सरकारने विधिमंडळात पहिले कागदरहित (पेपरलेस) असलेले एकूण ५ लाख ५० हजार २७० कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा त्यात ३७ हजार ४१० कोटी रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
अर्थमंत्री सुरेश खन्ना यांनी उर्दू कवी मंजूर हाशमी यांच्या गझलेच्या ‘यकीन हो तो कोई रास्ता निकलता है, हवा की ओट भी लेकर चिराग जलता है,’ अशा ओळीने अंदाजपत्रकाचे लॅपटॉपवरून वाचन केले.. यावेळी त्यांनी उत्तरप्रदेशला आत्मनिर्भर बनवत सर्वांगिण विकास साधण्याचे लक्ष्य असल्याचे सांगितले.
दरम्यान, पुढील वर्षी राज्यात विधानसभा निवडणूक होत असून, त्यापूर्वीचे हे योगी सरकारचे पाचवे आणि कार्यकाळातील अखेरचे अंदाजपत्रक आहे. यात कोरोना महामारीसंबंधी औषधी तसेच लसीकरण, बेरोजगारी, अयोध्या मंदिर, कृषी आदींसाठी विशेष तरतूद केल्याचे दिसून येते.
वित्तमंत्री सुरेश खन्ना यांनी राज्यातील शेतकरी योजनांना झुकते माप दिले आहे. मोफत पाणी सुविधांसाठी सुमारे ७०० कोटी रुपयांची तरतूद केली असल्याचे सांगितले. याशिवाय कमी व्याजदरात कर्जपुरवठा करण्याची ग्वाही दिली. राज्यात अधिक उत्पादन होणार्‍या पिकांचा गट तयार करून तालुकास्तरावर कृषी उत्पादन संघटनांची स्थापना केली जाईल. यासाठी सुमारे १०० कोटी रुपयांचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. स्पर्धा परीक्षांचे उमेदवार असलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना मोफत टॅबलेट देण्यात येतील. याशिवाय बेरोजगारांनाही विशेष प्रकारचे आर्थिक सहाय्य देण्याचे निश्‍चित करण्यात आले आहे.
ठळक वैशिष्ट्ये
ऋ लखनौमध्ये राष्ट्रीय प्रेरणास्थळाची निर्मिती
ऋ शेतकर्‍यांना मोफत पाणी उपलब्ध करणार
ऋ विद्यार्थी- विद्यार्थिनींना मोफत टॅबलेट
ऋ कोरोना लसीकरणासाठी मोठी तरतूद
ऋ तरुणांना आकर्षित करण्याचा प्रयत्न
ऋ शेतकर्‍यांना स्वस्त कर्ज पुरवठा

Posted by : | on : 22 Feb 2021
Filed under : उत्तर प्रदेश, राज्य
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g