|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 6:40 ए एम | सूर्यास्त : 5:51 पी एम
हवामान

किमान तापमान : 26.83° से.

कमाल तापमान : 26.99° से.

तापमान विवरण : overcast clouds

आद्रता : 36 %

वायू वेग : 3.29 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

26.99° से.

हवामानाचा अंदाज

23.59°से. - 28.49°से.

बुधवार, 27 नोव्हेंबर घनघोर बादल
हवामानाचा अंदाज

23.46°से. - 28.72°से.

गुरुवार, 28 नोव्हेंबर छितरे हुए बादल
हवामानाचा अंदाज

23.66°से. - 28.57°से.

शुक्रवार, 29 नोव्हेंबर टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

23.19°से. - 28.07°से.

शनिवार, 30 नोव्हेंबर छितरे हुए बादल
हवामानाचा अंदाज

22.54°से. - 28.07°से.

रविवार, 01 डिसेंबर कुछ बादल
हवामानाचा अंदाज

22.51°से. - 26.58°से.

सोमवार, 02 डिसेंबर टूटे हुए बादल
Home » पश्चिम बंगाल, राज्य » निवडणुकीपर्यंत ममता एकट्या पडणार

निवडणुकीपर्यंत ममता एकट्या पडणार

जितके हल्ले कराल, तितक्याच सक्षमपणे उभे राहू: अमित शाह यांचा घणाघात,
मिदनापूर, १९ डिसेंबर – ममता बॅनर्जी आणि तृणमूल कॉंगे्रसमधील गुंडशाहीला अनेक नेते आणि कार्यकर्ते वैतागले आहेत. आज या पक्षाचे सात नेते भाजपात आले. येण्याचा हा ओघ सुरूच राहणार असून, आगामी विधानसभा निवडणुकीपर्यंत तृणमूलमध्ये ममता बॅनर्जी एकट्याच उरलेल्या असतील, असा घणाघाती हल्ला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज शनिवारी येथे चढविला.
मिदनापूर येथे विशाल जाहीर सभेला संबोधित करताना अमित शाह म्हणाले की, मला काही बडबड्या नेत्यांनी सांगितले की, बंगालमध्ये तृणमूलला कुणीही पराभूत करू शकत नाही. लोकसभा निवडणुकीच्या आधीही असा दावा करण्यात आला होता की, बंगालमध्ये भाजपा एकही खासदार निवडून आणू शकणार नाही, पण भाजपाने या राज्यात १८ जागांवर विजय मिळविला. आताही मी विश्‍वासाने सांगतो की, आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपा २०० पेक्षा जास्त जागा जिंकून सत्तेत येणार आहे. पुढील सरकार हे भाजपाचेच राहणार आहे, याविषयी माझ्या मनात किंचितही शंका नाही.
भाजपात आज जे लोक प्रवेश करीत आहेत, त्यांनी ‘मां माटी मानुष’ या विचारांनी तृणमूलला साथ दिली होती, पण ममता बॅनर्जी यांनी या विचारांना टोलबाजी, परिवारवाद, तिरस्कारवाद आणि हप्ता वसुलीत परिवर्तित केले. ममतांनी कॉंग्रेस सोडली, ते देखील पक्षांतरच होते, असा टोला त्यांनी हाणला.
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, सरचिटणीस कैलास विजयवर्गीय यांच्यासह पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांवर अलीकडेच तृणमूलच्या गुंडांनी हल्ला केला. या पक्षाने चालविलेल्या राजकीय हिंसाचारात भाजपाच्या शेकडो नेते व कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला आहे. मी ममतांना इतकेच सांगू इच्छितो की, तुम्ही जितके हल्ले कराल, तितक्याच क्षमतेने आम्ही येथे उभे राहू आणि मजबूतही होऊ, असे त्यांनी ठासून सांगितले.
शेतकर्‍याच्या घरी घेतले जेवण
स्थानिक मंदिरात दर्शन घेतल्यानंतर जाहीर सभास्थळाकडे रवाना होण्यापूर्वी अमित शाह यांनी बालिजहुरी गावातील शेतकरी सनातनसिंह यांच्या घरी जेवण घेतले. यावेळी त्यांच्यासोबत सरचिटणीस कैलास विजयवर्गीय, भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकुल रॉय आणि प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष हे देखील होते. घरातील महिलांनी या सर्वांना जेवण वाढले. बसण्याची व्यवस्था चटई टाकून करण्यात आली होती. वरण, दोन भाज्या, पोळ्या, भात आणि खीर अशा प्रकारचे जेवण वाढण्यात आले.

Posted by : | on : 19 Dec 2020
Filed under : पश्चिम बंगाल, राज्य
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g