किमान तापमान : 21.99° से.
कमाल तापमान : 23.77° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 49 %
वायू वेग : 4.31 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
21.99° से.
21.99°से. - 28.49°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.46°से. - 28.72°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर छितरे हुए बादल23.66°से. - 28.57°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.19°से. - 28.07°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर छितरे हुए बादल22.54°से. - 28.07°से.
रविवार, 01 डिसेंबर कुछ बादल22.51°से. - 26.58°से.
सोमवार, 02 डिसेंबर टूटे हुए बादलमिदनापूर, १९ डिसेंबर – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा आजचा बंगाल दौरा भाजपासाठी राजकीयदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा ठरला. तृणमूल कॉंगे्रसचे दिग्गज नेते आणि आमदार सुवेंदू अधिकारी यांच्यासह एकूण नऊ आमदार आणि एका खासदाराने आज शनिवारी अमित शाह यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला.
तृणमूलचे खासदार सुनील मंडल यांनीही भाजपाचे कमळ हातात घेतले. मागील काही दिवसांपासून त्यांनी ममता बॅनर्जी यांच्या कार्यपद्धतीवर सडकून टीका केली होती.
आज भाजपात प्रवेश करणार्यांमध्ये तृणमूलचे पाच, माकप, भाकप व कॉंगे्रसच्या प्रत्येकी एक आमदारांचा समावेश आहे. याशिवाय, तृणमूलचे माजी खासदार दशरथ तिर्की यांनीही भाजपात प्रवेश केला. या सर्व आमदारांच्या शेकडो समर्थकांनीही भाजपाचे सदस्यत्व स्वीकारले आहे.
तृणमूल कॉंगे्रसचा राजीनामा देऊन भाजपात सहभागी झालेले सुवेंदू अधिकारी यांनी शनिवारी बंगालवासीयांना खुले पत्र लिहिले आहे. पुढील वर्षी होणार्या विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या सर्वांसमोर पर्याय खुला आहे. तृणमूलच्या अत्याचारातून बंगालला मुक्त करण्यासाठी फक्त भाजपाचीच निवड करा, असे आवाहन त्यांनी या पत्रातून केले आहे.