किमान तापमान : 24° से.
कमाल तापमान : 24.03° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 43 %
वायू वेग : 4.65 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24° से.
23.96°से. - 28.14°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर घनघोर बादल24.05°से. - 28.38°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर छितरे हुए बादल24.28°से. - 28.24°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.6°से. - 27.68°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर छितरे हुए बादल23.18°से. - 27.95°से.
रविवार, 01 डिसेंबर कुछ बादल23.02°से. - 26.24°से.
सोमवार, 02 डिसेंबर टूटे हुए बादलसुवेंदू अधिकारी यांचे बंगालवासीयांना खुले पत्र,
कोलकाता, १९ डिसेंबर – तृणमूल कॉंगे्रसचा राजीनामा देऊन भाजपात सहभागी झालेले सुवेंदू अधिकारी यांनी शनिवारी बंगालवासीयांना खुले पत्र लिहिले आहे. पुढील वर्षी होणार्या विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या सर्वांसमोर पर्याय खुला आहे. तृणमूलच्या अत्याचारातून बंगालला मुक्त करण्यासाठी फक्त भाजपाचीच निवड करा, असे आवाहन त्यांनी या पत्रातून केले आहे.
ममता बॅनर्जी आज तृणमूल कॉंगे्रसला आपल्या घरची संपत्ती समजत आहेत. मी म्हणजेच तृणमूल असे त्या मानत आहेत. कोणताही पक्ष एका व्यक्तीच्या बळावर आणि एका रात्रीत मोठा होत नसतो. यात सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे आणि पक्षाच्या धोरणांवर विश्वास ठेवणार्या नागरिकांचेही फार मोठे योगदान असते. तुमच्या सर्वांच्या श्रमामुळे, बलिदानामुळेच २०११ मध्ये हा पक्ष राज्यात सत्तेवर आला होता, पण आज याच सामान्यांचा पक्षाला विसर पडला आहे. तृणमूलला ज्या नागरिकांनी मोठे केले, सत्ता दिली, त्यांच्यावरच या पक्षाचे गुंड अत्याचार, अन्याय करीत आहेत, असेही अधिकारी यांनी पत्रात नमूद केले.
आज या पक्षात निष्ठावंत कार्यकर्त्यांना अपमानित आणि अपात्र लोकांना जवळ केले जात आहे. हा पक्ष आता स्वार्थी लोकांचा आहे. जनतेच्या आणि राज्याच्या विकासासाठी आता या पक्षाला त्याची जागा दाखविण्याची वेळ आलेली आहे, असा संदेशही त्यांनी दिला.
पुढील सरकार भाजपाचेच
दरम्यान, भाजपात प्रवेश केल्यानंतर भव्य जाहीर सभेत बोलताना अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार हल्ला चढविला आणि राज्यात पुढील सरकार भाजपाचेच येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. बंगालमध्ये तृणमूलच्या गुंडांनी लोकशाहीची हत्या केल्याचा आरोपही त्यांनी केला.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मी अमित शाह यांना पहिल्यांदा भेटलो होतो. त्यानंतर अलीकडेच मला कोरोनाची लागण झाली. तृणमूलच्या एकाही नेत्याने माझी चौकशी केली नाही, पण अमित शाह यांनी दोन वेळा फोन करून, माझी चौकशी केली. आज ममता बॅनर्जी अन्य राज्यातील लोकांना बाहेरचे संबोधत नाही. आतले आणि बाहेरचे असा सिद्धांत तयार करून, त्या राज्याचे विभाजन करीत आहेत. अशा पक्षात मी आपली इतकी वर्षे घालवली, याची मला लाज वाटते, असा आरोपही त्यांनी केला.
भाजपामुळेच तृणमूलचे अस्तित्व
माझ्यावर आज राजद्रोहाचा आरोप होत आहे, पण तृणमूलमधील बहुतांश नेते राजद्रोही आहेत. फक्त भाजपामुळेच या पक्षाचे अस्तित्व आजही कायम आहे. भाजपा नसेल, तर कदाचित हा पक्ष अस्तित्वातही आला नसता, असे त्यांनी सांगितले.