किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 23.61° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 46 %
वायू वेग : 3.82 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 28.55°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर घनघोर बादल23.28°से. - 28.56°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.22°से. - 28.61°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.05°से. - 26.8°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर साफ आकाश22.52°से. - 27.89°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर घनघोर बादल22.33°से. - 26.62°से.
रविवार, 01 डिसेंबर टूटे हुए बादलकोलकाता, १८ डिसेंबर – सुवेंदू अधिकारी यांच्या पाठोपाठच तृणमूल कॉंगे्रसचे आमदार शीलभद्र दत्त आणि पक्षाच्या अल्पसंख्यक विभागाचे महासचिव कबिरूल इस्लाम यांनीही आज शुक्रवारी राजीनामा दिला. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना विधानसभा निवडणुकीपूर्वी आणखी दोन मोठे धक्के बसले असून, भाजपा माझ्या पक्षाच्या नेत्यांची दिशाभूल करीत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
सलग दोन वेळा आमदार म्हणून निवडून आलेले दत्ता यांनी पत्रपरिषदेत आपल्या राजीनाम्याची माहिती दिली. मी आपला राजीनामा ममता बॅनर्जीना ई-मेल केला आहे. मी केवळ पक्षाचा राजीनामा दिला आहे; आमदारकी सोडली नाही, असे त्यांनी सांगितले.
पक्षात सध्या जी स्थिती आहे, ती माझ्यासारख्या नेत्यांसाठी चांगली नसल्यामुळे मी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे, असे ते म्हणाले. आपण आमदारकीचा राजीनामा का दिला नाही, असे विचारले असता, मी पक्षाच्या बळावर निवडून आलो नाही. जनतेने मला विजयी केले आहे. मी जनतेचा प्रतिनिधी आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांच्यावरही टीका केली.
दत्ता यांच्या राजीनाम्यानंतर अवघ्या काही वेळातच कबिरूल इस्लाम यांनीही ममतांना राजीनामा पाठविला. दरम्यान, हे दोघेही निवडणुकीपूर्वी भाजपात प्रवेश करणार असल्याची शक्यता त्यांच्या निकटच्या सूत्रांनी वर्तविली आहे.
सुवेंदू अधिकारींचा राजीनामा नामंजूर
दरम्यान, बंगाल विधानसभेचे अध्यक्ष बिमन बॅनर्जी यांनी सुवेंदू अधिकारी यांचा राजीनामा फेटाळला आहे. या राजीनामा पत्रावर तारीख नाही आणि नियमानुसार तो देण्यात आलेला नसल्याने, आपण राजीनामा नामंजूर करीत असून, अधिकारी यांना २१ रोजी स्वत: उपस्थित राहण्याचा आदेश देत असल्याचे अध्यक्षांनी स्पष्ट केले.
सुवेंदू अधिकारी यांना ‘झेड’ सुरक्षा
तृणमूल कॉंगे्रसच्या आमदारकीचा राजीनामा देणारे सुवेंदू अधिकारी यांना केंद्र सरकारने आज शुक्रवारी ‘झेड’ सुरक्षा कवच उपलब्ध केले आहे. यानुसार घरांत आणि पश्चिम बंगालमधील दौर्यांच्या काळात त्यांना सीआरपीएफच्या विशेष कमांडोजची सुरक्षा राहणार आहे. राजीनाम्यानंतर त्यांच्या जिवाला असलेला धोका लक्षात घेऊन केंद्राने हा निर्णय घेतला आहे. बंगालच्या बाहेर मात्र त्यांना वाय प्लस सुरक्षा असेल. यातही कमांडोजही सीआरपीएफचेच असतील, असे केंद्रीय गृहमंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.