किमान तापमान : 24.74° से.
कमाल तापमान : 24.99° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 5.97 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
23.55°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.63°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलपणजी, २२ मार्च – गोव्याची राजधानी पणजी महानगर पालिकेवर भाजपा पुरस्कृत गटाने जोरदार मुसंडी मारत झेंडा फडकावला आहे. बहुमतासाठी लागणार्या आकड्यापेक्षाही भाजपाने जास्त जागा जिंकल्या असून, कॉंग्रेस पुरस्कृत गटासह अपक्षांचा या निवडणुकीत धुव्वा उडाला आहे.
पणजी महापालिकेच्या एकूण ३० जागांसाठी मतमोजणी करण्यात आली. सर्व ३० जागांचा निकाल जाहीर झाला असून, यापैकी २५ जागा भाजपा पुरस्कृत प्रोग्रेस फॉर टूगेदर या गटाने जिंकल्या आहेत. बहुमतासाठी १६ जागांचा आकडा पार करणे आवश्यक होते. या विजयामुळे पणजी महापालिकेवर पुन्हा एकदा भाजपची सत्ता प्रस्थापित झाली आहे. कॉंग्रेस पुरस्कृत केवळ ५ जण निवडून आले.
गोव्यातील सहा पैकी पाच नगर परिषदांवरही भाजपाने दणदणीत विजय मिळविला आहे. एका परिषदेवर आणि महापालिकेवर कॉंगे्रसचा विजय झाला आहे. यावेळची निवडणूक पक्षीय पातळीवर लढण्यात आली नव्हती, हे विशेष. नागरिकांनी पुन्हा एकदा भाजपाच्या विकासकामांवर आपला विश्वास व्यक्त केला, अशी प्रतिक्रिया गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी निवडणूक निकालानंतर व्यक्त केली.