किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलकोलकाता, २३ मार्च – पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या पाचव्या, सहाव्या, सातव्या आणि आठव्या टप्प्यासाठी १३ उमेदवारांची यादी भाजपाने सोमवारी जाहीर केली. भाजपाने विधान परिषदेचे सदस्य नीरज तमांग झिंबा, विश्वजित दास आणि अर्थशास्त्री अशोक लाहिरी या दिग्गजांना उमेदवारी दिली आहे.
झिंबा यांना दार्जिलिंग विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी जाहीर करण्यात आली, तर दास यांना बागडा मतदारसंघाचे तिकीट देण्यात आले आहे. ही निवडणूक सहाव्या टप्प्यात होणार आहे. लाहिरी हे बालुरघाट मतदारसंघातून लढतील. ही निवडणूक सातव्या टप्प्यात होणार आहे. सातव्या टप्प्यातच होणार्या राशबेहारी मतदारसंघातून भाजपाने लेफ्टनंट जनरल सुब्रत साहा यांना भाजपाने रिंगणात उतरवले आहे. भाजपाने सुभा प्रधान यांना कलिपॉंग आणि विष्णुप्रसाद शर्मा यांना कुर्सेआँग मतदारसंघातून उमेदवारी दिली. या दोन्ही मतदारसंघांत पाचव्या टप्प्यात निवडणूक होणार आहे. सहाव्या टप्प्यात सुभाष सिन्हा करंदिही, अमितकुमार कुंडू इटाहार, अशोक क्रिटोनिया उत्तर बनगाव आणि सुब्रत ठाकूर गायघाट मतदारसंघातून लढतील.