किमान तापमान : 24.74° से.
कमाल तापमान : 24.99° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 5.97 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
23.55°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.63°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल– अनेक घरांचे नुकसान,
श्रीनगर, (२७ ऑक्टोबर) – पाकिस्तानी रेंजर्सने केलेल्या बेछूट गोळीबारात जम्मूमधील आंतरराष्ट्रीय सीमेवरील गावांमध्ये डझनभर विवाह सोहळे उधळले गेले आणि अनेकांना काही विधींमध्ये शेवटच्या क्षणी बदल करावा लागला. ईशांत सैनी आणि संगीता यांच्या विवाह सोहळ्यात आरएस पुरा सेक्टरमध्ये पाकिस्तानने केलेल्या जोरदार गोळीबारात बहुतांश पाहुण्यांना पळून जावे लागले. पाकिस्तान सीमेपलीकडून २०२१ नंतर युद्धविरामाचे उल्लंघन करून गुरुवारी रात्री ८ वाजता अर्निया परिसरात गोळीबार सुरू झाला. या गोळीबाराने २५ फेब्रुवारी २०२१ रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात नव्याने झालेल्या युद्धविरामाच्या आधी सतत आणि तीव‘ गोळीबाराच्या आठवणींना उजाळा दिला.
सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) म्हणण्यानुसार, शुक्रवारी पहाटे ३ वाजेपर्यंत पाकिस्तानकडून गोळीबार सुरू होता आणि त्याला भारताकडून प्रत्युत्तर देण्यात आले. ईशांत सैनीचा भाऊ दीपकने वृत्तसंस्थेला सांगितले की, आमच्या गावात पाकिस्तानी गोळीबाराची माहिती मिळाल्यानंतर मेजवानीचा आनंद न घेता परत गेलेल्या पाहुण्यांबद्दल वाईट वाटत आहे. आम्हाला विवाहाच्या काही विधींमध्ये शेवटच्या क्षणी बदल करावे लागले. आमच्या परंपरेनुसार सप्तपदी वधूच्या घरी करायची होती, पण ते शून्य रेषेजवळ असल्याने, हा महत्त्वाचा विधीही या ठिकाणीच करण्याचा निर्णय आम्ही घेतला, असे दीपकने सांगितले. ही वेळ भात कापणीची आहे. पण पाकिस्तानच्या गोळीबारामुळे मजुरांना पळून जावे लागले. चार ते पाच वर्षांनंतर आमच्या गावावर पाकिस्तानकडून गोळीबार झाला, असे नई बस्ती येथील दीपक चौधरी यांनी सांगितले.