किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल– मध्यप्रदेश विधानसभा निवडणुक प्रचाराची जोरदार सुरुवात,
नवी दिल्ली, (२७ ऑक्टोबर) – मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने आपल्या ४० स्टार प्रचारकांची यादी आज जाहीर केली. या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथसिंह, भूपृष्ठ परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, गृहमंत्री अमित शाह यांचा समावेश आहे. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, प्रदेश भाजपाचे प्रभारी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, सहप्रभारी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, प्रदेश भाजपा अध्यक्ष विष्णूदत्त शर्मा, सहसंघटनमंत्री शिवप्रकाश, सत्यनारायण जतिया यांचाही या यादीत समावेश आहे.
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आसामचे हेमंत बिस्वशर्मा, उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य, ब्रिजेश पाठक, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, स्मृती इराणी, अनुराग ठाकूर, ज्योतिरादित्य शिंदे, अर्जुन मुंडाही, एसपी सिंह बघेल या यादीत आहे. नरेंद्रसिंह तोमर, प्रल्हादसिंह पटेल आणि फग्गनसिंह कुलस्ते या तीन केंद्रीय मंत्र्यांना भाजपाने निवडणुकीच्या रिंगणात उतरवले असून त्यांचाही स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश आहे. भाजपाचे महासचिव कैलास विजयवर्गीय निवडणूक लढवत असून, भाजपाने त्यांनाही स्टार प्रचारक जाहीर केले आहे. नरोत्तम मिश्रा, जयभानसिंह पवैया, गोपाल भार्गव, राजेंद्र शुक्ला, लालसिंह आर्य, गणेशसिंह, कविता पाटीदार, गौरीशंकर बिसेन या राज्यातील नेत्यांवरही स्टार प्रचारक म्हणून निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली आहे. २३० सदस्यीय मध्यप्रदेश विधानसभेसाठी १७ नोव्हेंबरला एका टप्प्यात मतदान होत आहे.