किमान तापमान : 23.81° से.
कमाल तापमान : 23.93° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 57 %
वायू वेग : 4.88 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.93° से.
23.71°से. - 24.88°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.37°से. - 25.6°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.45°से. - 26.84°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश23.9°से. - 25.67°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.94°से. - 25.02°से.
गुरुवार, 16 जानेवारी घनघोर बादल23.69°से. - 26.74°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादलअयोध्या, (१९ जानेवारी) – देशात सर्वत्र राममय वातावरण आहे. राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा दिमाखदार सोहळा आपल्या डोळ्यांत साठवून घेण्यासाठी अनेक राम भक्त प्रयत्नशील आहेत. देशभरातील रामभक्तांना २२ जानेवारीला प्रभू श्रीरामाच्या अभिषेक सोहळ्याचे दूरदर्शनवरून थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे. या सोहळ्यात लोकांनी आभासी स्वरूपात सहभागी व्हावे, असे आवाहन राम मंदिर तीर्थक्षेत्र न्यासने केले आहे.
अयोध्येतील नवनिर्मित राम मंदिरातून सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत संपूर्ण धार्मिक सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. अयोध्या धाममधील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे थेट प्रक्षेपण दूरदर्शनच्या डीडी न्यूज आणि डीडी नॅशनल चॅनेलवर केले जाणार आहे. दूरदर्शन इतर वृत्तसंस्थांसोबतही फीड शेअर करणार आहे. इतर ब्रॉडकास्टर्ससाठी दूरदर्शन युट्यूब लिंक शेअर करणार आहे.
प्रभू राममंदिराचा हा पवित्र सोहळा देशालाच नव्हे, तर संपूर्ण जगाला दाखविण्याची तयारी दूरदर्शनने केली आहे. जगभरातील अनेक भारतीय दूतावास आणि वाणिज्य दूतावासांमध्ये या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. याशिवाय भारतभरातील हजारो मंदिरे आणि चौक्यांवरही हा कार्यक्रम प्रसारित करण्याची तयारी करण्यात येत आहे.
४० कॅमेरे बसवण्यात येणार
राम मंदिराचा अभिषेक सोहळा थेट दाखवण्यासाठी दूरदर्शन सुमारे ४० कॅमेरे बसवत आहे. नवनिर्मित राम मंदिर परिसराव्यतिरिक्त शरयू घाटाजवळील राम की पौडी, कुबेर टेकडीजवळील जटायू पुतळा अशा ठिकाणी हे कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.