किमान तापमान : 24.74° से.
कमाल तापमान : 24.99° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 5.97 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
23.55°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.63°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलबंगळुरू, (१० जानेवारी) – एकाच कुटुंबातील ८ जणांनी अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने कर्नाटक विधानसभेबाहेर अचानक गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. स्वत:ला जाळण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी शाहिस्ता बानो आणि मुनेद उल्लाह यांनी सांगितले की, त्यांना गृहनिर्माण मंत्र्यांकडून कोणतीही मदत मिळाली नाही. २०१६ मध्ये बँकेकडून घेतलेल्या कर्जासंदर्भात त्यांना गृहनिर्माण मंत्र्यांची मदत हवी होती.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
मुनेद उल्लाह यांनी २०१६ मध्ये एका सहकारी बँकेकडून ५० लाखांचे कर्ज घेतले होते. आले लागवडीसाठी त्यांनी हे कर्ज घेतले होते मात्र नफा मिळण्याऐवजी त्यांचे मोठे नुकसान झाले. तेव्हापासून त्यांनी सुमारे ९६ लाख रुपये बँकेत भरल्याचेही कुटुंबीयांचे म्हणणे आहे. मात्र यातील बहुतांश रक्कम व्याजाची असल्याचे सांगून बँकेचे लोक त्यांना त्रास देत आहेत.
ते पुढे म्हणाले की, कर्जाची थकबाकी वसूल करण्यासाठी बँक त्यांचे वडिलोपार्जित घर विकण्याची प्रक्रिया सुरू करत आहे. घराची किंमत ३ कोटींपेक्षा जास्त असताना बँकेने त्यांचे घर १ कोटी ४० लाख रुपयांना विकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
पोलिसांनी ताब्यात घेतले
या कारणांमुळे हे कुटुंब विधानसभेच्या बाहेर जाहीरपणे आत्महत्या करण्यासाठी आले होते. मात्र तेथे सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांनी त्याला अडवून ताब्यात घेतले.