किमान तापमान : 26.49° से.
कमाल तापमान : 26.82° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 39 %
वायू वेग : 3.32 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.82° से.
24.66°से. - 28.14°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर घनघोर बादल24.05°से. - 28.38°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर छितरे हुए बादल24.28°से. - 28.24°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.41°से. - 27.68°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर छितरे हुए बादल23.18°से. - 27.95°से.
रविवार, 01 डिसेंबर कुछ बादल23.02°से. - 26.24°से.
सोमवार, 02 डिसेंबर टूटे हुए बादलकोलकाता, ९ डिसेंबर – ममता बॅनर्जी आणि असहिष्णुता या दोन्ही गोष्टी आता समानार्थी झाल्या आहेत, असा घणाघाती हल्ला भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आज बुधवारी येथे चढविला. पश्चिम बंगालमधील आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपा दोनशेपेक्षा जास्त जिंकून सत्तेत येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
नड्डा दोन दिवसांच्या बंगाल दौर्यावर आले आहेत. कॉंगे्रस, तृणमूल कॉंगे्रससह काही राजकीय पक्ष घराणेशाहीच्या राजकारणालाच महत्त्व देत असतात. या पक्षांमध्ये मालकशाही आहे आणि त्यांच्याच आदेशानुसार इतरांना वागावे लागते. भाजपा हाच खरा कुटुंब असलेला एकमेव पक्ष आहे, असे त्यांनी राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये भाजपाच्या नऊ नव्या कार्यालयांचे उद्घाटन केल्यानंतर सांगितले.
एका विशिष्ट समाजाचे तुष्टीकरण करणे, हाच ममतांचा धर्म झाला आहे. या समाजाच्या मतांवर डोळा ठेवून त्या दररोज खोटी आश्वासने देत असतात. आता त्यांची ही आश्वासने चालणार नाहीत आणि राज्यातील जनताही त्यावर विश्वास ठेवणार नाही. कारण आतापर्यंत आपली दिशाभूल झाली आहे, हे लोकांना माहीत झाले आहे. त्यांनी आपला पर्याय निवडला असून, आगामी निवडणुकीत बंगालमधील सत्ता भाजपाच्याच हातात सोपविणार आहेत, असे नड्डा यांनी विश्वासाने सांगितले.
५ ऑगस्ट रोजी अयोध्येत राममंदिराचे भूमिपूजन सुरू होते. संपूर्ण देशात स्थानिक पातळीवर हा सोहळा पाहण्यासाठी मोठे पडदे लावण्यात आले होते, पण ममता बॅनर्जी यांनी त्याच दिवशी कठोर टाळेबंदी जाहीर केली होती; मात्र ३१ जुलै रोजी बकरी ईदेसाठी टाळेबंदीचे सर्व नियम शिथिल केले होते. यातून त्यांच्या मनात एका विशिष्ट समाजासाठी किती जास्त पुळका आहे, हेच दिसून येते, असा आरोप नड्डा यांनी केला.
राजस्थानमधील विजय विरोधकांना चपराक
लोकांचा आता भाजपावर विश्वास नाही, असा दावा शेतकरी आंदोलनाच्या काळात विरोधी पक्ष सातत्याने करीत होते. याच काळात भाजपाने हैदराबाद महानगर पालिका निवडणुकीत ४८ जागा जिंकल्या आणि आता राजस्थानमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही सर्वाधिक जागा जिंकल्या. हे दोन्ही निकाल विरोधकांना मोठी चपराक आहे. आपले राजकीय अस्तित्व गमावलेले हे विरोधक देश पेटवायला निघाले आहेत. शेतकरी आंदोलन हे याच विरोधकांचे कटकारस्थान आहे, असा जोरदार हल्ला त्यांनी केला.