किमान तापमान : 21.99° से.
कमाल तापमान : 23.77° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 49 %
वायू वेग : 4.31 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
21.99° से.
21.99°से. - 28.49°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.46°से. - 28.72°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर छितरे हुए बादल23.66°से. - 28.57°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.19°से. - 28.07°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर छितरे हुए बादल22.54°से. - 28.07°से.
रविवार, 01 डिसेंबर कुछ बादल22.51°से. - 26.58°से.
सोमवार, 02 डिसेंबर टूटे हुए बादलविधानसभा पोटनिवडणुकीपूर्वी अडचणी वाढण्याचे संकेत,
जयपूर, १० डिसेंबर – राजस्थानात सत्तेत असूनही कॉंग्रेस पक्ष जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत माघारला असून, आगामी निवडणुकांसह मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यासाठी आव्हाने वाढू शकतात, असा अंदाज राजकीय सूत्रांनी वर्तविला आहे. दरम्यान, या निवडणुकीतील विजयाने भाजपा कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून येत आहे.
सहाडा विधानसभा समिती अंतर्गत सहाडा पंचायत समितीच्या १५ प्रभागांपैकी १० प्रभाग भाजपा, तर ५ प्रभाग कॉंग्रेसने जिंकले आहेत. भिलवाडा जिल्ह्यात सहाडा जिल्हा परिषद निवडणुकीतही भाजपाने एकतर्फी विजय मिळविला आहे. अशीच काहीशी स्थिती अन्य विधानसभा मतदारसंघातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये झालेली आहे. दुसरीकडे राजस्थानातील सहाडा, राजसमंद आणि सुजानगड विधानसभेच्या जागा रिक्त असून, मतदारसंघांचे आमदार कैलास त्रिवेदी, मास्टर भंवरलाल मेघवाल, किरण माहेश्वरी यांचे निधन झाले आहे. या तीन विधानसभा मतदारसंघातील पंचायत निवडणुकीत कॉंग्रेसचा पराभव झाला आहे.
दरम्यान, पंचायत निवडणूक निकालानंतर कॉंग्रेसमधील सत्ता आणि संघटनेबाबत असंतोष वाढण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळ विस्तार, राजकीय नेमणुकांना उशीर तसेच गटस्तरापर्यंत संघटना बांधण्यात कॉंग्रेस अपयशी ठरली आहे. यापूर्वी प्रदेशाध्यक्ष डोटासरा आणि मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या वतीने एकत्र निर्णय घेण्यात येत होते. आता मात्र सत्ता आणि संघटना स्तरांवर कॉंग्रेसला अडचण येऊ शकते, असे राजकीय जाणकारांंनी म्हटले आहे. याशिवाय माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांचे समर्थक या पराभवाला मुख्यमंत्री गहलोत यांना जबाबदार ठरवत नेतृत्वाकडे तक्रार करतील. त्यामुळे दोघांतील मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर येऊ शकतात, असेही बोलले जात आहे.