किमान तापमान : 23.25° से.
कमाल तापमान : 23.77° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 47 %
वायू वेग : 4.31 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.25° से.
22.99°से. - 28.49°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर घनघोर बादल23.46°से. - 28.72°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर छितरे हुए बादल23.66°से. - 28.57°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.19°से. - 28.07°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर छितरे हुए बादल22.54°से. - 28.07°से.
रविवार, 01 डिसेंबर कुछ बादल22.51°से. - 26.58°से.
सोमवार, 02 डिसेंबर टूटे हुए बादलममतांच्या बोलण्यात अराजकता दिसते : नड्डा,
कोलकाता, १० डिसेंबर – बुलेटप्रूफ कारमध्ये असल्याने मी सुदैवाने वाचलो, पण कैलास विजयवर्गीय यांच्या हाताला दगडाचा गंभीर मार बसला. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी आणि त्यांच्या गुंडांनी दहशत निर्माण केली आहे. आमच्यावर असे कितीही हल्ले झाले, तरी भाजपा थांबणार नाही. आता आपल्याला ममतांचा नव्हे, तर रवींद्रनाथ टागोर यांच्या स्वप्नातील बंगाल घडवायचा आहे, आम्ही चालत राहणार, लोक आमच्याशी आपोआपच जुळले जाणार आहेत, पुढील सरकार भाजपाचे असेल, अशा शब्दांत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आज गुरुवारी हल्ला चढविला.
ममता बॅनर्जींच्या बोलण्यातून अराजकता आणि असहिष्णुता दिसून येते. त्यांच्या गुंडांच्या दहशतीतून राज्यातील जनतेला मुक्त करण्याची वेळ आता आली आहे. मनमानी कारभार आणि एका विशिष्ट समाजाचे तुष्टीकरण हेच ममतांचे धोरण आहे. त्यांच्या गुंडशाहीला वैतागलेली जनता आता योग्य निर्णय घेणार आहे, असे नड्डा यांनी आज सायंकाळी आयोजित पत्रपरिषदेत सांगितले.
माझ्या ताफ्यातील सर्वच गाड्यांवर तृणमूलच्या गुंडांनी हल्ला केला. जोरदार दगडफेक झाली. अनेक दगड काचा फोडून आत घुसले. यात विजयवर्गीय यांच्या हाताला दुखापत झाली. आठ कार्यकर्ते जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे ते म्हणाले. रवींद्रनाथ टागोर यांच्या स्वप्नातील बंगाल हा नक्कीच नाही. आपल्याला तो घडवायचा आहे आणि पुढील विधानसभा निवडणुकीत ती संधी देखील आपल्याला मिळणार आहे. ममतांचे सरकार बाहेर फेकण्यासाठी मतदान करा, असे आवाहन त्यांनी केले.
ममतांच्या सरकारमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे. अंत्यसंस्कारातही दलाली दिली जाते. दलाली दिल्याशिवाय केंद्रीय मदत लोकांना मिळत नाही. निसर्ग चक्रीवादळासाठी केंद्राकडून आलेल्या एक हजार कोटींच्या मदतीत घोटाळा झाला. कॅगतर्फे याचा तपास करण्यात यावा, असे निर्देश कोलकाता उच्च न्यायालयाने दिल्यानंतर ममतांच्या सरकारने त्याविरोधात आव्हान दिले. घोटाळा झालाच नाही, असा दावा जर त्या करतात, तर मग कॅग चौकशीची त्यांना भीती का वाटते, असा सवाल नड्डा यांनी केला.