किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 23.61° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 46 %
वायू वेग : 3.82 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 28.55°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर घनघोर बादल23.28°से. - 28.56°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.22°से. - 28.61°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.05°से. - 26.8°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर साफ आकाश22.52°से. - 27.89°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर घनघोर बादल22.33°से. - 26.62°से.
रविवार, 01 डिसेंबर टूटे हुए बादलतृणमूलच्या समर्थकांचे कृत्य,
कोलकाता, १० डिसेंबर – भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या ताफ्यावर बुधवारी रात्री तृणमूल कॉंगे्रसच्या गुंडांनी हल्ला केला. नड्डा सध्या पश्चिम बंगालच्या दोन दिवसांच्या दौर्यावर आहेत. अयोध्या नगरजवळ हा हल्ला करण्यात आला.
या हल्ल्यात नड्डा सुखरूप बचावले. मात्र, गुंडांनी भाजपाचे सरचिटणीस कैलास विजयवर्गीय यांच्या गाडीची तोडफोड केली. नड्डा यांच्या सुरक्षेत राहिलेल्या उणिवांबाबत केंद्र सरकारने ममता बॅनर्जी सरकारकडे अहवाल मागितला आहे.
खासदार अभिषेक बॅनर्जी यांचा मतदारसंघ असलेल्या डायमंड हार्बरकडे नड्डा यांचा ताफा जात असताना तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी लाठ्या आणि दगडांसह हल्ला चढवला. त्यांच्या ताफ्यावर जोरदार दगडफेक करण्यात आली, असा आरोप भाजपाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी केला.
घोष यांनी या हल्ल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्राद्वारे कळविली. यानंतर लगेच शाह यांनी नड्डा यांच्या सुरक्षेत उणीव का राहिली, यावर राज्य सरकारला स्पष्टीकरण मागितले. हा हल्ला तृणमूलच्याच गुंडांनी केला असल्याचा आरोप भाजपाने केला. तृणमूलने मात्र भाजपाचा आरोप फेटाळला आहे.
ममतांच्या राज्यात गुंडागर्दी वाढली : भाजपा
भाजपाध्यक्ष नड्डा यांच्या ताफ्यावर झालेला हल्ला तृणमूल प्रायोजित असून, ममता बॅनर्जी यांच्या राज्यात गुंडागर्दी वाढली असल्याचेच यावरून स्पष्ट होते. या राज्यात दररोज लोकशाहीची हत्या केली जात आहे, असा आरोप भाजपाने केला आहे.
नड्डा यांच्यावरील हल्ल्याच्या घटनेवर राज्यपाल जगदीप धनकड यांनीही चिंता व्यक्त केली आहे. डायमंड हार्बर येथील नड्डा यांच्या बैठकीच्या काळात कायदा व सुव्यवस्थेची समस्या निर्माण होऊ शकते, असा इशारा मी आधीच पोलिस विभाग आणि गृह विभागाला दिला होता.