किमान तापमान : 23.99° से.
कमाल तापमान : 24.42° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 46 %
वायू वेग : 3.09 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.99° से.
23.29°से. - 28.55°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर घनघोर बादल23.28°से. - 28.56°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.22°से. - 28.61°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.05°से. - 26.8°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर साफ आकाश22.52°से. - 27.89°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर घनघोर बादल22.33°से. - 26.62°से.
रविवार, 01 डिसेंबर टूटे हुए बादलनवी दिल्ली, ११ डिसेंबर – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आजवरच्या विदेश दौर्यांची माहिती हा गोपनीयतेचा भाग असल्याने, ती जाहीर केली जाऊ नये, असा स्पष्ट आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने आज शुक्रवारी दिला आहे.
पंतप्रधानांच्या दौर्यांची माहिती आरटीआय कार्यकर्त्याला उपलब्ध केली जावी, असा निर्देश केंद्रीय माहिती आयोगाने भारतीय हवाई दलाला दिला होते. या सर्व दौर्यांमध्ये पंतप्रधानांसोबत कोणत्या मंत्रालय व विभागातील किती लोक गेले होते, तसेच विमानात आणखी किती लोक होते, याविषयीची माहिती एका आरटीआय कार्यकर्त्याने मागितली होती. कार्मिक मंत्रालय आणि हवाई दलाने ती देण्यास नकार दिल्यानंतर आरटीआय कार्यकर्त्याने केंद्रीय माहिती आयोगाकडे धाव घेतली होती. त्यावर आयोगाने संबंधित विभागांना माहिती उपलब्ध करण्याचे निर्देश दिले होते.
हे प्रकरण उच्च न्यायालयात गेल्यानंतर न्या. नवीन चावला यांच्या पीठाने आयोगाच्या निर्देशाला स्थगिती दिली. कोणत्या प्रकारची माहिती द्यायची आणि कोणती गोपनीय ठेवायची, हा अधिकार कार्मिक आणि संरक्षण मंत्रालयाचा आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले. या प्रकरणी पुढील सुनावणी आता १२ एप्रिल रोजी होणार आहे.