किमान तापमान : 26.49° से.
कमाल तापमान : 26.82° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 39 %
वायू वेग : 3.32 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.82° से.
24.66°से. - 28.14°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर घनघोर बादल24.05°से. - 28.38°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर छितरे हुए बादल24.28°से. - 28.24°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.41°से. - 27.68°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर छितरे हुए बादल23.18°से. - 27.95°से.
रविवार, 01 डिसेंबर कुछ बादल23.02°से. - 26.24°से.
सोमवार, 02 डिसेंबर टूटे हुए बादलअतिरिक्त तुकड्यांसाठी पूर्वसूचना आवश्यक,
कोलकाता २१ एप्रिल – सुरक्षा दलाच्या अतिरिक्त तुकड्या दिल्यास पश्चिम बंगालमध्ये शेवटच्या दोन टप्प्यातील मतदान सोबतच घेणे शक्य आहे, असे पत्र येथील निवडणूक निरीक्षकांनी पाठवले असले, तरी या दोन टप्प्यांतील एकत्रित मतदान शक्य नसल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. देशात कोरोनाचा वाढता प्रसार पाहता उरलेल्या सर्व टप्प्यातील मतदान एकदाच घेण्याची मागणी होत आहे. तृणमूल कॉंग्रेसच्या अध्यक्ष आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा मतदान एकाच टप्प्यात घेण्याची मागणी केली आहे.
कोरोनामुळे आतापर्यंत दोन उमेदवारांचा मृत्यू झाला आहे, असे या अधिकार्याने सांगितले. निवडणूक निरीक्षक अजय नायक आणि विवेक दुबे यांनी मागील आठवड्यात या संदर्भात निवडणूक आयोगाला पत्र पाठवले होते. मात्र, त्याला अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.
सध्या बंगालमध्ये केंद्रीय दलांच्या १००० कंपन्या कार्यरत आहेत. पुढचा टप्पा जवळ आहे. त्यामुळे, याबद्दल काहीही केले जाऊ शकत नाही. कोरोना संसर्गाच्या तीव्रतेची माहिती निवडणूक आयोगाला आहे. म्हणूनच, निरीक्षकांनी शेवटच्या दोन टप्प्यातील मतदान सोबत घेण्याचा पर्याय दिला आहे. हे मतदान सोबत घ्यायचे झाल्यास ५०० अतिरिक्त कंपन्यांची गरज भासेल, असे निवडणूक आयोगाला पत्र पाठविणार्या अधिकार्याने सांगितले.
निरीक्षकांची शिफारस दोन कारणांमुळे मान्य करणे शक्य नाही. सुरक्षा दलाची अतिरिक्त कुमक पाठवण्यासाठी तीन ते चार महिन्यांपूर्वी सूचना देणे आवश्यक आहे. शेवटच्या दोन टप्प्यांत एकत्रित मतदान घेतल्यास लोकप्रतिनिधी कायदा १९५१ अंतर्गत उमेदवारांच्या हक्कांचे उल्लंघन होईल, त्यामुळे ही शिफारस मान्य करता येणार नाही, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.