किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलकोलकाता, २१ एप्रिल – पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठी उद्या गुरुवारी मतदान होणार आहे. या टप्प्यात ४३ जागांसाठी एकूण ३०६ उमेदवार रिंगणात असून, मतदान शांततेत पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाने सुरक्षा व्यवस्ता चोख ठेवली आहे.
यापूर्वीच्या टप्प्यांमध्ये हिंसाचाराच्या घटना घडल्या, तर चौथ्या टप्प्याच्या काळात जवानांच्या रायफली हिसकावण्याचा प्रयत्न करणार्या जमावाला पांगविण्यासाठी करण्यात आलेल्या गोळीबारात चार जणांचा मृत्यू झाला होता. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आयोगाने जवानांच्या अतिरिक्त तुकड्या संवेदनशील भागांमध्ये तैनात केल्या आहेत.
या टप्प्यातील सर्वच मतदान केंद्रांवर केंद्रीय दलांच्या १,०७१ तुकड्या तैनात आहेत. एकूण १४,४८० मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात येणार आहे, अशी माहिती आयोगाच्या वरिष्ठ अधिकार्याने दिली.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने, कोरोनाविषयक सर्व नियमांचे पालन करून, मतदान शांततेत कसे पार पडेल, यावरही आयोगाचा विशेष भर राहणार असल्याचे अधिकार्याने सांगितले. मंगळवारी बंगालमध्ये एकाच दिवशी १०,६५२ बाधित आढळून आले होते.
या टप्प्याचे विशेष महत्त्व म्हणजे, मातुआ समाज कोणत्या पक्षासाठी मतदान करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ४३ पैकी १७ जागांवर या समाजाचे प्राबल्य आहे.