किमान तापमान : 23.25° से.
कमाल तापमान : 23.77° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 47 %
वायू वेग : 4.31 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.25° से.
22.99°से. - 28.49°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर घनघोर बादल23.46°से. - 28.72°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर छितरे हुए बादल23.66°से. - 28.57°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.19°से. - 28.07°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर छितरे हुए बादल22.54°से. - 28.07°से.
रविवार, 01 डिसेंबर कुछ बादल22.51°से. - 26.58°से.
सोमवार, 02 डिसेंबर टूटे हुए बादलगोव्यातील विद्यार्थ्यांचे विशेष संशोधन,
पणजी, २२ एप्रिल – इमारतींची सफाई करताना हानिकारक रसायनांच्या संपर्कात येऊन त्रास सोसणार्या मजुरांची दुर्दशा पाहून येथील फतोर्डा येथील डॉन बॉस्को अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ‘सॅनिटायझिंग रोबोट’ची निर्मिती केली आहे. ४०० मीटर दूर अंतरावरूनही हा रोबोट संचालित करता येतो.
इच्छाशक्ती, तळमळ, समस्यांवर मात करण्याची वृत्ती असल्यास काय चमत्कार होतो हे गोव्याच्या या विद्यार्थ्यांनी वरील संंशोधनाने दाखवून दिले आहे. रोबोट व संबंधित डिव्हाईस व फवारणी करणारी यंत्रे अतिनील प्रकाशाचा (अल्ट्राव्हायोलेट लाईट) वापर करून शुद्ध केली जाऊ शकतात. त्यामुळे कोरोनाशी संबंधित जैविक कचर्याची विल्हेवाट या रोबोटच्या मदतीने कामगारांना दूरूनच लावता येणार आहे. तसेच त्यांना कुठल्याही हानिकारक रसायनांना सामोरे जावे लागणार नाही.
इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार शाखेचे विवेक खाडिलकर, साईल कामत आणि दृष्टी नाईक यांनी हा रोबोट तयार केला असून, हे विद्यार्थी आता त्याचे डिझाईन पेटंट मिळविण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यांचा हा प्रकल्प गोवा सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने स्वीकारला असून, रोबोट तयार करण्यासाठी आलेला खर्चाची संपूर्ण रक्कम सरकारने संबंधित मुलांना दिली आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी रोबोटचे प्रत्यक्ष कार्य पाहिल्यानंतर आरोग्य सेवा संचालनालयातील अधिकार्यांना वैद्यकीय सेवेसाठी याचा वापर करण्यासंदर्भात सूचना केल्या आहेत.
यंदा आम्हाला आमच्या अंतिम वर्षाच्या प्रकल्पासाठी एखादा विषय निवडायचा होता. तेव्हा देशातील कोरोना महामारीचे थैमान पाहून त्याच्याशी संबंधित सॅनिटायझिंग रोबोटचा विषय आम्ही निवडला असे विवेक खाडीलकर याने सांगितले. आम्ही पाठीवर रसायनांची टाकी घेऊन इमारतींची स्वच्छता व फवारणी करणार्या कामगारांची छायाचित्रे वर्तमानपत्रात आणि समाजमाध्यमांवर पाहिली. ही छायाचित्रे पाहून खूप वाईट वाटले. या रसायनामुळे त्यांच्या जीवितास कायमच धोका होता. तेव्हा कोरोनाचे संकट लक्षात घेऊन या कामागारांसाठी सुरक्षित व उपयोगी उपकरण बनविण्याचा निश्चय आम्ही केला, असेही विवेक म्हणाला. विद्यार्थ्यांनी विविध शोधनिबंधांच्या माध्यमातून याचा अभ्यास केला. कामत म्हणाले, रोबोटिक सॅनिटायटेशन डिव्हाईसवर आधीपासूनच बरेच संशोधन झाले आहे. मात्र, अल्ट्राव्हायोलेट किरणांचा वापर करून स्वच्छता करता येणारे व फवारणी करणारे कोणतेही उपकरण आतापर्यंत उपलब्ध नसल्याचे आमच्या लक्षात आले. म्हणूनच आम्ही हा सॅनिटायझिंग रोबोट बनविला, अशी माहिती साईल कामत याने दिली.
आमचे रोबोटिक डिव्हाईस सलग आठ तास काम करू शकेल. यात प्रत्येकी १२ व्हीच्या दोन बॅटरी आहेत. तसेच फवारणीसाठी पाच नोझल आहेत, ज्याची लांबी सहा मीटर आहे, असे या विद्यार्थ्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी सांगितले की २९५ नॅनोमीटर तरंगलांबीचा अल्ट्राव्हायोलेट लाईट विषाणूची पुनरुत्पादक साखळी तोडू शकतो. त्यामुळेच आजच्या या कोरोना संकटाच्या पृष्ठभूमीवर हा रोबोट उपयुक्त ठरू शकतो, असेही ते म्हणाले. या बहुउपयोगी संशोधनाबद्दल विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.