किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक, बॉम्बहल्ल्यात सहा जखमी,
कोलकाता, २२ एप्रिल – पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात आज गुरुवारी सुमारे ८० टक्के मतदान झाले. विशेष म्हणजे, निवडणूक आयोगाने केलेल्या तगड्या सुरक्षा व्यवस्थेमुळे या टप्प्यात मतदानकाळात मोठ्या हिंसाचाराची घटना घडली नसली, तरी उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील तितागढ मतदारसंघात अज्ञात लोकांनी फेकलेल्या बॉम्बच्या स्फोटात एका लहान मुलासह सहा जण जखमी झाले.
चार जिल्ह्यांमधील विधानसभेच्या ४३ जागांसाठी सहाव्या टप्प्यात मतदान घेण्यात आले. २७ महिलांसह एकूण ३०६ उमेदवारांचे भवितव्य मतदारांनी इव्हीएममध्ये बंद केले. सकाळी सात वाजेपासून सुरू झालेले मतदान सायंकाळी सहा वाजेनंतरही सुरूच होते. यासाठी १४,४८० मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली होती. १.०३ कोटी मतदार या टप्प्यात मतदान करण्यासाठी पात्र होते. यातील सुमारे ८० टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क पार पाडला, अशी माहिती आयोगाच्या अधिकार्याने दिली. बंगाालमधील मतदानाचे आणखी दोन टप्पे शिल्लक असून, ते अनुक्रमे २६ आणि २९ एप्रिल रोजी घेण्यात येणार आहेत.
उत्तर २४ परगणा, नादिया, उत्तर दिनाजपूर आणि पूर्व वर्धमान या चार जिल्ह्यांमध्ये हे मतदान घेण्यात आले. भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकुल रॉय, अभिनेत्री कौशानी मुखर्जी यांच्यासह ममता सरकारमधील काही वरिष्ठ मंत्री या टप्प्यातील निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत.
तितागड विधानसभा मतदारसंघातील एका मतदान केंद्रावर काही अज्ञात लोकांनी बॉम्ब फेकला. यात सहा जण जखमी झाले. तर, उत्तर परगणा जिल्ह्यातील अशोकनगर विधानसभा संघातील एका केंद्रावर सुरक्षा दलाच्या जवानांवर चालून येणार्या तृणमूल कॉंगे्रसच्या गुंडांना रोखण्यासाठी केलेल्या गोळीबारात एक जण जखमी झाला. तो तृणमूलचाच कार्यकर्ता असल्याचा आरोप पक्षाने केला आहे.
अशोकनगर येथील ७९ क्रमांकाच्या दिघ्रा मालिकबेरिया मतदान केंद्रावरील पोलिंग एजंटला धक्काबुक्की झाल्याचा आरोप झाला. उत्तर दिनाजपूर येथील चोप्रा भागात भाजपा आणि तृणमूल कॉंग्रेस कार्यकर्त्यांत हाणामारी झाल्याचे वृत्त आहे.