किमान तापमान : 23.99° से.
कमाल तापमान : 25.09° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 46 %
वायू वेग : 3.17 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.99° से.
23.91°से. - 28.21°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर घनघोर बादल23.88°से. - 28.16°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर छितरे हुए बादल23.85°से. - 28.29°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.36°से. - 26.86°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर साफ आकाश23.11°से. - 27.74°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर घनघोर बादल23.04°से. - 26.29°से.
रविवार, 01 डिसेंबर टूटे हुए बादल६० जणांचा जीव वाचविण्यात यश,
नवी दिल्ली, २३ एप्रिल – राजधानी दिल्लीत प्राणवायूचे गंभीर संकट निर्माण झाले असून, येथील प्रतिष्ठेच्या सर गंगाराम रुग्णालयात प्राणवायूच्या कमतरतेमुळे २५ जणांचा मृत्यू झाला आहे. आणखी ६० रुग्णांचा जीव धोक्यात आला असताना, ऐन वेळी प्राणवायू उपलब्ध झाल्याने, त्यांना वाचविण्यात यश आले.
पुरेसा प्राणवायू उपलब्ध नसल्यामुळे कृत्रिम श्वसन प्रणाली (व्हेंटिलेटर) तसेच बिपाप प्रभावीपणे काम करीत नाही, रुग्णालयाला तातडीने प्राणवायूची आवश्यकता असून, तो मिळाला नाही तर ६० रुग्णांचा जीव धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही, असे वैद्यकीय अधीक्षकांनी सांगितले. यानंतर तातडीने प्राणवायू उपलब्ध झाला.
सर गंगाराम रुग्णालयात कोरोनाचे ५०० बाधित भरती असून, यातील १५० जणांना मोठ्या दाबाने प्राणवायूचा पुरवठा करण्याची गरज आहे. रुग्णालयाजवळ पाच तास पुरेल एवढाचा साठा असल्याची माहिती आम्ही सरकारला देऊन रुग्णालयाला तातडीने प्राणवायूचा पुरवठा करण्याची मागणी केली असल्याचे वैद्यकीय अधीक्षकांनी म्हटले आहे. रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी मानवी प्रयत्नाने आम्ही व्हेंटिलेटर सुरू ठेवले आहे, असे या अधीक्षकांनी पुढे सांगितले.
रुग्णालयाचा खुलासा
प्राणवायूच्या कमतरतेमुळे रुग्णांचा मृत्यू झाला, हे वृत्त पूर्णपणे चुकीचे आहे. आमच्या अतिदक्षता कक्षात प्राणवायूचा दाब कमी झाला असता, आम्ही मानवी पद्धतीने प्रयत्न करून बाधितांचा जीव वाचवला, असे गंगाराम रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. डी. एस. राणा यांनी नंतर सांगितले.
सर गंगारामसोबत हिंदूराव रुग्णालयातही प्राणवायूचा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे नवीन रुग्ण दाखल करून घेण्यास या रुग्णालयांनी नकार दिला आहे.