किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 23.61° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 46 %
वायू वेग : 3.82 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
23.57°से. - 28.55°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर घनघोर बादल23.28°से. - 28.56°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.22°से. - 28.61°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.05°से. - 26.8°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर साफ आकाश22.52°से. - 27.89°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर घनघोर बादल22.33°से. - 26.62°से.
रविवार, 01 डिसेंबर टूटे हुए बादलउत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळून ९ ठार, मोठ्या प्रमाणात बचावकार्य सुरू,
डेहराडून, २४ एप्रिल – उत्तराखंडमध्ये जोशीमठाजवळ पुन्हा हिमकडा कोसळून ९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत ४३० जणांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले आहे. हिमकडा कोसळल्याने ऋषी गंगेची पातळी वाढली असल्याची माहिती आहे.
शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास चमोली जिल्ह्यातील भारत-चीन सीमेजवळ ही घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच भारतीय लष्कराने तातडीने बचावकार्य सुरू केले. सुरक्षितपणे बाहेर काढलेल्या लोकांना लष्करी शिबिरात ठेवण्यात आले आहे. यात सहा जणांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. शुक्रवारी चमोली जिल्ह्यातील जोशीमठ विभागातील सुमना क्षेत्रात जोरदार बर्फवृष्टी सुरू होती. यामुळे ही घटना घडली असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घटनेनंतर उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथसिंह रावत यांनी टि्वटरवरून अतिदक्षतेचा इशारा दिला होता. तसेच भारतीय लष्कराने बचावकार्य सुरू केलं होतं. आज शनिवारी मुख्यमंत्री तीरथसिंह रावत यांनी घटनास्थळाचा हवाई दौरा केला. तसेच प्रशासकीय अधिकार्यांना सूचना दिल्या आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी घटनेचा आढावा घेतला. त्यानंतर एनडीआरएफ आणि जिल्हा प्रशासनाला सूचना दिल्या. त्यानंतर बचावकार्याला अधिक वेग आला. आज मी हवाई पाहणी केली आहे. बचावकार्य सुरू आहे. मात्र, रस्ता अजूनही बंद आहे, असे मुख्यमंत्री रावत यांनी सांगितले.
याआधी ७ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी साडे दहा वाजता चमोली जिल्ह्यातील तपोवनमध्ये हिमनग तुटून ऋषिगंगा नदीत पडला होता. या दुर्घटनेत ५० हून अधिक जणांचा मृत्यू झाला होता. तर अनेक जण बेपत्ता झाले होते.