किमान तापमान : 23.22° से.
कमाल तापमान : 23.68° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 6.13 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.22° से.
22.99°से. - 26.27°से.
शुक्रवार, 24 जानेवारी टूटे हुए बादल23.33°से. - 26.99°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
सोमवार, 27 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
मंगळवार, 28 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादलकोलकाता, २९ डिसेंबर – पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपा २०० पेक्षा जास्त जागा जिंकून सत्तेत येईल, असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सातत्याने करीत आहेत. भाजपाने राज्यात फक्त ३० जागाच जिंकून दाखवाव्या, असे आव्हान तृणमूल कॉंगे्रसच्या सर्वेसर्वा आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिले आहे.
ममता बॅनर्जी यांनी आज मंगळवारी बीरभूम जिल्ह्यात पदयात्रा काढली. यानंतर एका जाहीर सभेत बोलताना त्यांनी भाजपावर हल्ला चढविला. भाजपाने २०० जागांचे स्वप्न नंतर पाहावे, अगोदर ३० जागा जिंकून दाखवाव्या, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या.
भाजपाच्या राष्ट्रीय नेत्यांच्या बंगाल दौर्यांवरही त्यांनी टीका केली. भाजपा नेते प्रत्येक आठवड्याला येथे येतात आणि पंचातारांकित हॉटेलमध्ये जेवतात. मात्र, आपण जणू आदिवासींच्या घरी जेवण करीत आहोत, असे चित्र रेखाटत असतात, असा आरोप त्यांनी केला.
आम्ही वर्षाचे ३६५ दिवस गुरू रवींद्रनाथ टागोर यांच्यासोबत आहोत. भाजपा मात्र दररोज खोटे व्हिडिओ तयार करून समाजात द्वेष निर्माण करीत आहे. जे लोक महात्मा गांधी आणि देशाच्या महापुरुषांचा सन्मान करीत नाही, ते सोनार बांगला बनविण्याच्या गप्पा मारत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.
काही आमदारांनी पक्ष सोडला म्हणून काही फरक पडत नाही. जनता आमच्यासोबत आहे. भाजपा काही आमदारांना विकत घेऊ शकते, मात्र तृणमूल कॉंग्रेसला नाही, असा दावाही त्यांनी केला.