किमान तापमान : 26.14° से.
कमाल तापमान : 27.37° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 59 %
वायू वेग : 2.98 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.37° से.
23.94°से. - 28.01°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.34°से. - 28.79°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.11°से. - 29.17°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.12°से. - 29.06°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर घनघोर बादल23.74°से. - 28.87°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.62°से. - 28.2°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर टूटे हुए बादलभोपाळ, २९ डिसेंबर – लग्नाचे आमिष दाखवून आणि बळजबरीच्या धर्मांतरावर बंदी घालणार्या आणि दोषींविरोधात कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या अध्यादेशाला मध्य प्रदेशातील भाजपा सरकारने आज मंगळवारी मंजुरी दिली. अंतिम शिक्कामोर्तब करण्यासाठी हा अध्यादेश आता राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्याकडे पाठविण्यात आला आहे. यापूर्वी उत्तर प्रदेश सरकारनेही अशाच प्रकारचा कायदा पारित केला आहे.
मध्य प्रदेश धार्मिक स्वातंत्र्य विधेयक असे या कायद्याचे नाव असून, लग्नाचे आमिष किंवा इतर मार्गाने हिंदू मुलींचे बळजबरीने धर्मांतर करणार्यांविरोधात यात १० वर्षांचा कारावास आणि एक लाख रुपयांच्या दंडाची तरतूद आहे. हे विधेयक शनिवारी मंजूर करण्यात आले होते. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या अध्यक्षतेत आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या विशेष बैठकीत त्यावरील अध्यादेशालाही मंजुरी देण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी पत्रपरिषदेत दिली.
राज्य विधिमंडळाच्या नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात हे विधेयक सादर करता आले नव्हते, त्यामुळे अध्यादेशाचा मार्ग स्वीकारण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
हिंदू मुलींचे लग्नासाठी बळजबरीने धर्मांतर करण्यात आले असल्याच्या असंख्य तक्रारी सरकारकडे प्राप्त झाल्या आहेत. विद्यमान कायदे अशा घटना रोखण्यासाठी सक्षम नसल्याने, सरकारने कठोर तरतुदी असलेला हा कायदा तयार केला आहे, असे ते म्हणाले.