किमान तापमान : 23.22° से.
कमाल तापमान : 23.68° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 6.13 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.22° से.
22.99°से. - 26.27°से.
शुक्रवार, 24 जानेवारी टूटे हुए बादल23.33°से. - 26.99°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
सोमवार, 27 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
मंगळवार, 28 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादलकोलकाता, २८ डिसेंबर – बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी रविवारी संध्याकाळी, पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनकड यांची भेट घेत एक तास चर्चा केल्याचे वृत्त आहे. ही भेट सदिच्छास्वरूपाची असल्याचे सांगण्यात येत असले, तरी गांगुली यांच्या भाजपा प्रवेशाची चर्चा राज्यात सुरू झाली आहे.
या संदर्भात जगदीप धनकड यांनी टि्वटरवर म्हटले की, राजभवनात बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यासोबत अनेक मुद्यांवर चर्चा पार पडली. गांगुली यांनी देशातील सर्वात जुने ईडन गार्डन्स मैदान पाहण्याचे आमंत्रण दिले असून, ते स्वीकारण्यात आले आहे.
बंगालमध्ये पुढील वर्षी एप्रिल-मे महिन्यात विधानसभा निवडणूक होत असून, त्यापूर्वीच राजकीय हालचालींना वेग आला आहे. काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत तृणमूल कॉंग्रेसचे बंडखोर शुभेंदू अधिकारी यांच्यासह काही आमदारांनी भाजपात प्रवेश केला होता; तर भाजपा खासदार सौमित्र खान यांच्या पत्नी सुजाता मंडल तृणमूल कॉंग्रेसमध्ये दाखल झाल्या.
तसेच आगामी १२ जानेवारीला स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीच्या निमित्ताने गृहमंत्री अमित शाह पुन्हा एकदा पश्चिम बंगाल दौर्यावर येत आहेत. यावेळी सौरव गांगुली यांचा भाजपा प्रवेश निश्चित मानला जात असून, गांगुली यांच्याकडून मात्र अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. विशेष म्हणजे सौरव गांगुली यांना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदाचे दावेदार मानले जात आहे.