किमान तापमान : 25.35° से.
कमाल तापमान : 25.99° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 61 %
वायू वेग : 2.35 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
25.99° से.
24.27°से. - 28.58°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर घनघोर बादल24.07°से. - 29.1°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.12°से. - 28.81°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर घनघोर बादल23.93°से. - 29.28°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.59°से. - 28.72°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर कुछ बादल22.96°से. - 28.47°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर घनघोर बादलजैशच्या चौघांसह आठ अतिरेक्यांना अटक,
जम्मू, २७ डिसेंबर – उत्तर काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यातील एक हिंदू मंदिर बॉम्बस्फोट करून उडविण्याचा प्रयत्न जवानांनी हाणून पाडला. या प्रकरणी चार अतिरेक्यांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याजवळून दोन रायफली आणि सहा हातबॉम्ब जप्त करण्यात आले आहेत. अन्य एका घटनेत जैशच्या ४ अतिरेक्यांना अटक करण्यात आली.
मंदिर उडवण्याच्या कटात अटक करण्यात आलेल्यांची नावे मुश्तफा इक्बाल आणि मूर्तझा इक्बाल अशी असून, उर्वरित दोघांची ओळख अद्याप जाहीर करण्यात आली नाही. मुश्तफाच्या मोबाईलची तपासणी करण्यात आली असता, त्याला दररोज पाकिस्तानी क्रमांकांवर फोन येत असल्याचे उघडकीस आले आहे. पूंछच्या अरी गावातील हिंदू मंदिरावर गर्दीच्या वेळी बॉम्बहल्ला करण्याची कामगिरी आमच्यावर सोपविण्यात आली होती, अशी कबुलीही या दोघांनी दिली.
सुरक्षा दलाच्या जवानांनी आज रविवारी सकाळी जैश-ए-मोहम्मदच्या चार अतिरेक्यांना अटक केली. यातील एक जण जम्मू-काश्मीर पोलिस खात्यात कार्यरत होता. पोलिसांच्या काही रायफलींसह त्याने पळ काढून तो अतिरेकी झाला होता. अन्य एका घटनेत मंदिरावर बॉम्बहल्ला करण्याच्या तयारीत असलेल्या आणखी चार अतिरेक्यांना अटक करण्यात आली आहे.
जैशचे काही अतिरेकी एका कारने जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर, जवान आणि पोलिसांनी हयातपुरा भागात नाकेबंदी केली. प्रत्येक वाहनाची तपासणी सुरू असताना, एका कारने पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, जवानांनी ती अडवली. सभोवताल सशस्त्र जवानांना पाहून अतिरेक्यांनी शरणागती पत्करली, अशी माहिती पोलिस प्रवक्त्याने दिली.
अल्ताफ हुसैन, शबिर अहमद भट, जमशीद मागरे आणि झाहिद दार अशी या अतिरेक्यांची नावे असून, हे सर्व जण पुलवामाचे रहिवासी आहेत. यातील अल्ताफ हा पोलिस दलात कार्यरत होता. याच वर्षीच्या जानेवारी महिन्यात त्याने दोन एके-४७ रायफली चोरल्या आणि अतिरेकी झाला होता. त्याच्यासोबत जहांगिर नावाचा आणखी एक पोलिसही पळाला होता, पण त्याला काही दिवसांतच अटक करण्यात आली होती, असे प्रवक्ता म्हणाला.
घातपात घडविण्याची होती योजना
या चौघांचीही कसून चौकशी केली असता, घातपात घडविण्याच्या तयारीत ते असल्याचे दिसून आले. त्यांच्याजवळून तीन एके रायफल्स, मोठ्या प्रमाणात काडतुसा आणि हातबॉम्ब जप्त करण्यात आले आहेत.