किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलइम्फाळ, २७ डिसेंबर – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील सहा वर्षांच्या काळात ईशान्य भारतात विकासाचा महापूर आणला आहे. तळागाळातील लोकांपर्यंत विकासाची गंगा पोहोचली आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज रविवारी येथे केले.
कॉंगे्रसच्या अनेक वर्षांच्या सत्ताकाळात ईशान्य भाग स्वत:ची ओळख गमावून बसला होता. बंडखोरी गटांकडून हिंसाचार, जाळपोळ, आंदोलन या गोष्टी येथे नित्याचाच झाल्या होत्या, पण मोदी यांनी विकासावर भर दिला. कोणतीही समस्या विकासाच्या माध्यमातूनच सोडविली जाऊ शकते, या विश्वासातून त्यांनी आपल्या सत्ताकाळात ईशान्य भारतासाठी अनेक महत्त्वाच्या योजना राबविल्या आणि त्यांची पूर्तताही केली. यामुळे या भागाचा चेहरा बदलला आहे, असे शाह यांनी येथे काही प्रकल्पांचे उद्घाटन केल्यानंतर सांगितले.
मणिपूरला पूर्वी बंडखोरी, बंद, रास्ता रोको यासारख्या समस्यांनी ग्रासले होते. आज बहुतांश बंडखोर संघटना शरण आल्या असून राष्ट्रीय प्रवाहात त्या सहभागी झाल्या आहेत. नजीकच्या भविष्यात उर्वरित बंडखोरही शरण येतील. भाजपा सरकार यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहे, असे ते म्हणाले.
कॉंगे्रस पक्ष मणिपुरात सत्तेवर होता, पण समस्या सोडविण्याऐवजी त्या आणखी कशा चिघळतील, यावरच या पक्षाने भर दिला. मात्र, भाजपा सत्तेत आल्यानंतर सरकारने मणिपूरला विकासाच्या नव्या उंचीवर नेले. पंतप्रधान मोदी यांनीही या राज्यात नवनवे उपक्रम राबविणे सुरूच ठेवले. ‘इनर लाईन परमिट’ ही येथील जनतेसाठी मोदी सरकारची सर्वांत मोठी भेट आहे. न मागताच मोदींनी ती भेट दिली आहे, असे अमित शाह यांनी सांगितले.