किमान तापमान : 23.99° से.
कमाल तापमान : 25.42° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 64 %
वायू वेग : 3.03 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.99° से.
23.99°से. - 28.15°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर घनघोर बादल24.65°से. - 28.75°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.74°से. - 28.47°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर घनघोर बादल24.32°से. - 29.01°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर घनघोर बादल24.06°से. - 28.38°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर साफ आकाश23.5°से. - 28.34°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर घनघोर बादलदेशाची प्रतिमा सांभाळण्याचे सरकारला आवाहन,
बंगळुरू, २७ डिसेंबर – कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री तसेच जनता दल (धर्मनिरपेक्ष) नेते एचडी कुमारस्वामी यांनी कृषी कायद्यांना समर्थन दिले असून, एकदा खुल्या विचाराने नवीन कृषी कायद्यांचा प्रयोग करून पाहण्याचे आवाहन शेतकर्यांना केले आहे. तसेच, त्यांनी शेतकरी आंदोलनाने आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाच्या प्रतिमेवर विपरीत परिणाम होण्याचा इशाराही केंद्र सरकारला दिला आहे.
कुमारस्वामी म्हणाले की, चक्रव्यूहातून बाहेर पडण्यासाठी कृषी क्षेत्राने नवीन प्रयोगासाठी तयार असले पाहिजे. मागील अनेक वर्षांपासून भारतीय कृषी क्षेत्र एका चक्रात अडकले आहे, हा विचार कित्येक वर्षांपासून मांडला जात आहे. यामुळेच कोणत्याही नवीन प्रयोगासाठी तयार असणे गरजेचे आहे. याशिवाय भारतात काही समस्या आहेत, हे शेतकरी आंदोलनावरून दिसून येत आहे.
मात्र, आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताने मिळविलेली प्रतिष्ठा आणि त्याच्या प्रतिमेला नवीन कृषी कायद्यांद्वारे आणि त्या कायद्यांविरोधात होणार्या आंदोलनाने धक्का बसू नये, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
नवीन कृषी कायद्यांवर केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी केलेल्या आवाहनावरून एक आशा निर्माण झाली आहे. काही समस्या असल्यास कायदे मागे घेण्याचे आश्वासनही त्यांनी दिले असल्याने शेतकर्यांनी यावर नक्कीच विचार केला पाहिजे, असेही कुमारस्वामी यांनी म्हटले आहे.