किमान तापमान : 23.22° से.
कमाल तापमान : 23.68° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 6.13 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.22° से.
22.99°से. - 26.27°से.
शुक्रवार, 24 जानेवारी टूटे हुए बादल23.33°से. - 26.99°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
सोमवार, 27 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
मंगळवार, 28 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादलनोएडा, २७ डिसेंबर – गत काही वर्षांपासून उत्तर प्रदेशात वाहनांच्या नंबर प्लेटवर जातीची ओळख सांगण्याची एक नवीन प्रथा सुरू झाली आहे. यामुळे सामाजिक विषमता पसरण्याची व सामाजिक वातावरण गढूळ होण्याची भीती लक्षात घेऊन उत्तर प्रदेशच्या वाहतूक विभागाने विविध जातींच्या नावाचे स्टिकर्स असलेल्या वाहनांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
उत्तर प्रदेशमध्ये सध्या जातीय वर्चस्व दाखविण्याची लहर सुरू झाली आहे. अनेक कार, मोटारसायकल व इतर वाहनांच्या नंबर प्लेटवर यादव, जाट, गुरजर, ब्राह्मण, पंडित, क्षत्रिय, लोधी आणि मौर्य असे लिहिलेले स्टिकर्स लावले आहे. महाराष्ट्रातील शिक्षक हर्षल प्रभू यांनी पत्र पाठविल्यानंतर पंतप्रधान कार्यालयाने या विषयात लक्ष घातले. अशा पद्धतीचे स्टिकर्स म्हणजे आपली जी सामाजिक वीण आहे, त्यासाठी एक प्रकारचा धोका आहे, असे हर्षल प्रभू यांनी म्हटले होते.
पंतप्रधान कार्यालयाने या पत्राची दखल घेऊन उत्तर प्रदेश सरकारला निर्देश दिले. त्यानंतर ही मोहीम सुरू झाली. उत्तर प्रदेशत आता जातीचे स्टिकर्स असलेल्या गाड्या जप्त करण्यात येणार आहेत.