किमान तापमान : 30.79° से.
कमाल तापमान : 30.92° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 0.89 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
30.92° से.
27.34°से. - 30.99°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.73°से. - 29.67°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.66°से. - 30.59°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.36°से. - 31.64°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.5°से. - 30.53°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.69°से. - 30.56°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाशचेन्नई, २ डिसेंबर – बुरेवी चक्रीवादळ तामिळनाडूच्या दिशेने निघाले असून, कन्याकुमारी ते पंबान दरम्यान उद्या गुरुवारी रात्री ते शुक्रवारी पहाटे धडकण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. या चक्रीवादळामुळे तामिळनाडू आणि केरळात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
बुरेवी चक्रीवादळामुळे तामिळनाडूच्या तटवर्ती भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात असून, ७० ते ९० किलोमीटर प्रती तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. रामनाथपूरम् ते कन्याकुमारी जिल्ह्यात गुरुवारी दुपारपासून याचा प्रभाव दिसेल. तामिळनाडूच्या दक्षिण तटवर्ती क्षेत्राला या चक्रीवादळाचा मोठा फटका बसण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.
बंगालच्या उपसागरात नैऋत्य दिशेने तयार झालेले हे चक्रीवादळ वायव्य दिशेला १८ किमी प्रती तास या वेगाने मागील सहा तासांत सरकले असून, आज बुधवारी हे श्रीलंकेच्या त्रिंकोमाली येथून २०० किमी अंतरावर, तर भारतातील पंबानच्या ईशान्येला ६०० किमी अंतरावर पोहोचले आहे.
पुढील १२ तासांत याची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे तसेच श्रीलंकेतील त्रिंकोमाली ओलांडून पुढील १२ तासांत हे तामिळनाडूला धडक देईल. या वेळी वार्याचा वेग ८० ते ९० किमी प्रती तास राहण्याची शक्यता असून, हा वेग १०० किमी प्रती तासांपर्यंत होऊ शकतो, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.