किमान तापमान : 29.99° से.
कमाल तापमान : 30.02° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 48 %
वायू वेग : 2.45 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
29.99° से.
27.14°से. - 30.61°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर घनघोर बादल27.01°से. - 30.73°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.06°से. - 30.41°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.16°से. - 31.05°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.39°से. - 30.44°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.66°से. - 30.5°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाशअसदुद्दीन ओवैसी यांनी ओकली गरळ,
हैदराबाद, ३० नोव्हेंबर – ज्यांना हैदराबादचे नाव बदलायचे आहे त्यांच्या पिढ्या उद्ध्वस्त होतील. एकवेळ तुमचे नाव बदलेल पण तरीही हैदराबादचे नाव बदलणार नाही, अशी गरळ एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी ओकली.
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री आणि भाजपाचे नेते योगी आदित्यनाथ यांनी हैदराबादचे नाव ‘भाग्यनगर’ करू असे म्हटल्यानंतर असदुद्दीन ओवैसी यांचा चांगलाच थयथयाट झाला आहे. त्यांचा तोल आणि ताल योगींनी पार बिघडवून टाकला असून त्यामुळे ओवैसी वाटेल तशी बडबड करीत आहेत. ज्यांना शहराचे नाव बदलायचे आहे त्यांना आता जनतेनेच प्रत्युत्तर द्यायचे आहे, असे ओवैसींनी म्हटले आहे.
बृहत् हैदराबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपाने आपल्या बड्या बड्या नेत्यांना प्रचारासाठी रिंगणात उतरविले आहे. त्यामुळे निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे. आम्ही जिन्नाच्या हाकेला प्रतिसाद दिलाच नव्हता. जे रजाकार होते ते पाकिस्तानात गेले आणि जे प्रामाणिक होते ते हैदराबादमध्येच राहिले, असा दावा ओवैसी यांनी केला.
काय म्हणाले होते योगी आदित्यनाथ
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी हैदराबाद येथे आले होते. त्यावेळी प्रचारादरम्यान त्यांनी हैदराबादचे नाव भाग्यनगर करण्याचे आश्वासन दिले होते. इथे आल्यानंतर मला अनेकांनी हैदराबादचे नाव भाग्यनगर होऊ शकते का? असे विचारले. मी त्यांना म्हटले का नाही? आम्ही फैजाबादचे नाव अयोध्या केले, अलाहाबादचे नाव प्रयागराज केले. उत्तरप्रदेशात भाजपाची सत्ता आल्यानंतर हे बदल घडले. मग हैदराबादचे नाव भाग्यनगर का होणार नाही? असे योगी म्हणाले होते.