किमान तापमान : 23.81° से.
कमाल तापमान : 23.93° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 57 %
वायू वेग : 4.88 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.93° से.
23.71°से. - 24.88°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.37°से. - 25.6°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.45°से. - 26.84°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश23.9°से. - 25.67°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.94°से. - 25.02°से.
गुरुवार, 16 जानेवारी घनघोर बादल23.69°से. - 26.74°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादलमहापालिकेत आगामी महापौर भाजपाचाच!: अमित शाह यांची घोषणा,
हैदराबाद, २९ नोव्हेंबर – जगाचे आयटी केंद्र होण्याची पूर्ण क्षमता असलेल्या हैदराबादला निझाम संस्कृतीपासून मुक्त करण्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज रविवारी केली. या महानगर पालिकेत केवळ भाजपाचे संख्याबळ वाढवायला मी येथे आलो नाही. पुढील महापौर हा भाजपाचाच राहणार आहे, असा माझा विश्वास आहे, असेही अमित शाह यांनी स्पष्ट केले.
हैदराबाद महापालिकेसाठी मंगळवारी मतदान होणार आहे. आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अमित शाह यांनी एमआयएम नेते असदुद्दीन ओवैसींच्या या बालेकिल्ल्यात जोरदार शक्तिप्रदर्शन केले. भाजपाच्या रॅलीला मिळालेला प्रचंड प्रतिसाद पाहून भारावून गेलेले शाह यांनी सर्वांचे आभार मानले. आज मी फार काही बोलणार नाही. एक वचन देतो, लवकरच हैदराबादला निझामी संस्कृतीपासून मुक्ती मिळणार आहे, असे त्यांनी जाहीर केले.
जगाचे आयटी केंद्र होण्याची क्षमता असतानाही, तेलंगणा राष्ट्र समिती आणि कॉंगे्रसमुळे या शहराचा विकास रखडला आहे. या लोकांना विकास कधीच मान्य नव्हता आणि आजही नाही. मात्र, भाजपाची सत्ता आल्यानंतर हे सर्व अडथळे दूर करणार आहोत. कुणाचेही तुष्टीकरण आणि घराणेशाहीचे राजकारण न करता आम्ही हे सर्व करून दाखविणार आहोत. भाजपाने आतापर्यंत आपला एकही शब्द मोडलेला नाही. भाजपा जे बोलते, तेच करून दाखवते. आज मी जे काही बोलत आहे, त्यातील प्रत्येक शब्द खरा करून दाखविणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
…तर ओवैसी यांनी लिहून द्यावे
हैदराबादेतील घुसखोरांना देशातून हद्दपार करण्यात आपला पाठिंबा आहे, अशी लेखी हमी ओवैसी यांनी द्यावी, त्यानंतर त्यांनी आमच्या कारवाईचा अनुभव घ्यावा, असा चिमटाही त्यांनी काढला. देशातून ज्यावेळी रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांना हाकलण्याची मोहीम होती घेतली, त्यावेळी संसदेत निषेध आंदोलन करणारे ओवैसीच होते. या घुसखोरांच्या जोरावरच ते आतापर्यंत निवडणुका जिंकत आले आहेत. ओवैसींना देशाची आणि राष्ट्रीय सुरक्षेची नाही, तर या घुसखोरांची चिंता जास्त आहे, असा आरोपही त्यांनी केला.
टीआरएस-एमआयएममध्ये गुप्त करार
टीआरएस आणि एमआयएम यांच्यात गुप्त करार झाला आहे. मला त्यांच्या करारावर आक्षेप नाही. ते करार लपून का करतात, यावर माझा आक्षेप आहे. ते खोलीत ‘इलू-इलू’ करतात. एमआयएमसोबत आमचे संबंध आहेत, असे टीआरएस खुलेआम का जाहीर करीत नाहीत, असा सवाल शाह यांनी केला.
भाग्यलक्ष्मी मंदिरात पूजा
अमित शाह यांनी हैदराबादेत आल्यानंतर सर्वप्रथम जुन्या शहरातील भाग्यलक्ष्मी मंदिरात पूजा व देवीची आरती केली. यानंतर त्यांनी सिकंदराबादच्या वारसीगुडा येथे रोड शो केला. यावेळी लोकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.