किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलनवी दिल्ली, (१६ नोव्हेंबर) – येत्या शुक्रवारी छत्तीसगड आणि मध्यप्रदेशात विधानसभा निवडणुकीतील मतदान होत असून, काँग्रेस-भाजपासह स्थानिक पक्षांची नजर राज्यातील आदिवासी समुदायावरच आहे. छत्तीसगडमध्ये १७ नोव्हेंबर दुसर्या टप्प्यात ७० मतदारसंघात आणि मध्यप्रदेशात २३० जागांवर मतदान होत आहे. दोन्ही राज्यांत आदिवासी समुदायाची मोठी संख्या असून, सरकार बनविण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे.
मध्यप्रदेशात अनुसूचित जमातीच्या ४७ जागा आहेत. मागील तीन निवडणुकांमध्ये आदिवासींनी ज्या पक्षाला साथ दिली, त्याच पक्षाने सरकार स्थापन केल्याचे दिसून येते. २००८ आणि २०१३ मध्ये भाजपाने सर्वाधिक २९ आणि ३१ जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे भाजपचा मार्ग सुकर झाला. २०१८ मध्ये काँग्रेसने अनुसूचित जमातीसाठी राखीव ३० जागांवर ताबा मिळविला. तर, भाजपाला फक्त १६ जागांवर विजय मिळाला. परिणामी सत्ता काँग्रेसच्या हातात गेली. नंतर काँग्रेसमधील अंतर्गत बंडाळीचा फायदा घेत भाजपाने सरकार स्थापन केले.
छत्तीसगडमध्येही…
मध्यप्रदेश शेजारच्या छत्तीसगडमध्येही आदिवासींची लोकसंख्या मोठी आहे. या राज्यातील विधानसभेच्या ९० जागांपैकी २९ जागा राखीव आहेत. २००८ आणि २०१३ मध्ये भाजपाने १९ आणि ११ मतदारसंघात विजय मिळविला. तर, २०१८ मध्ये काँग्रेसने यापैकी २५ जागांवर ताबा मिळविल्याने त्यांना सत्ता स्थापन करता आली.