किमान तापमान : 24.99° से.
कमाल तापमान : 25.33° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 65 %
वायू वेग : 2.06 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
24.24°से. - 27.77°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर घनघोर बादल24.63°से. - 28.19°से.
रविवार, 24 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.58°से. - 28.88°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.85°से. - 29.25°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.25°से. - 28.36°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर घनघोर बादल23.83°से. - 29.02°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर टूटे हुए बादल– भाऊबिजेनिमित्त शिवराजसिंह चौहान यांनी केली घोषणा,
भोपाळ, (१६ नोव्हेंबर) – मध्यप्रदेशातील प्रत्येक बहिणीला लाडली बहना, महिला बचत गटांच्या माध्यमातून लक्षाधीश बनविणार असल्याचा निर्धार मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी व्यक्त केला. चौहान यांच्या निवासस्थानी बुधवारी भाऊबीज कार्यक्रम आयोजित केला होता. महिलांनी मुख्यमंत्र्यांना औक्षण केले तसेच त्यांच्या विजयाची कामना व्यक्त केली. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमही पार पडला.
शिवराजसिंह चौहान म्हणाले की, राज्य सरकारच्या वतीने प्रत्येक बहिणीला लक्षाधीश बनविण्याचा निर्धार करण्यात आला आहे. घरातील कामे सांभाळून प्रत्येक महिला प्रत्येक महिन्याला किमान १० हजार रुपयांची कमाई करेल. याशिवाय बचत गटांच्या माध्यमातूनही त्यांना आपले उत्पन्न वाढविता येणार आहे. या सर्व बहिणींपासून मला आशीर्वाद आणि ऊर्जा मिळते.
महिलांच्या मतांवर नजर
राज्य सरकारने ‘लाडली बहना’ योजना सुरू केल्याने यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपा महिला मतदारांप्रती मोठा विश्वास व्यक्त करीत आहे. ही योजना आधीपासून राज्यात सुरू असून, या अंतर्गत सव्वा कोटी महिलांच्या बँक खात्यात १ हजार २५० रुपये जमा करण्यात येत आहे. याशिवाय अन्य काही योजनाही महिलांसाठी सुरू करण्यात आल्या आहेत.