|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 6:33 ए एम | सूर्यास्त : 5:52 पी एम
हवामान

किमान तापमान : 27.88° से.

कमाल तापमान : 29.29° से.

तापमान विवरण : broken clouds

आद्रता : 42 %

वायू वेग : 3.39 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

29.29° से.

हवामानाचा अंदाज

25.84°से. - 30.87°से.

शुक्रवार, 15 नोव्हेंबर घनघोर बादल
हवामानाचा अंदाज

27.21°से. - 30.97°से.

शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

27.35°से. - 30.7°से.

रविवार, 17 नोव्हेंबर छितरे हुए बादल
हवामानाचा अंदाज

27.27°से. - 30.86°से.

सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

27.52°से. - 31.46°से.

मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश
हवामानाचा अंदाज

26.53°से. - 30.46°से.

बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश
Home »

नेत्यांच्या अनुपस्थितीमुळे इंडि आघाडीची बैठक रद्द

नेत्यांच्या अनुपस्थितीमुळे इंडि आघाडीची बैठक रद्दनवी दिल्ली, (०५ डिसेंबर) – इंडि आघाडीची बुधवारी दिल्लीत होणारी बैठक अनेक प्रमुख नेत्यांच्या अनुपस्थितीमुळे पुढे ढकलण्यात आली. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यासह आघाडीतील काही प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता नसल्याच्या वृत्तानंतर बैठक रद्द करण्यात आली. पुढील बैठक १८ डिसेंबरला होणार असल्याची माहिती आहे. चार राज्यांमधील विधानसभा निवडणूक निकाल जाहीर होताच भाजपाविरोधी इंडिया आघाडीने ६ डिसेंबर रोजी बैठक...5 Dec 2023 / No Comment / Read More »

पराभवाचे खापर काँग्रेसने अपेक्षेप्रमाणे फोडले इव्हीएमवर

पराभवाचे खापर काँग्रेसने अपेक्षेप्रमाणे फोडले इव्हीएमवर– चिप असलेली मशिन हॅक करणे शक्य : दिग्विजयसिंह, भोपाळ, (०५ डिसेंबर) – चिप असलेले कोणतेही मशिन हॅक केले जाऊ शकते, असा दावा करीत काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिग्विजसिंह यांनी मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या पराभवाचे खापर अपेक्षेप्रमाणे इव्हीएमवर फोडले आहे. मी २००३ पासून इव्हीएमद्वारे मतदानाला विरोध करीत असल्याचे त्यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले. चीप असलेले कोणतेही मशीन हॅक केले जाऊ शकते. मी २००३ पासून ईव्हीएमद्वारे मतदानाला विरोध करीत आहे....5 Dec 2023 / No Comment / Read More »

मध्यप्रदेशात भाजपाची ७ टक्के मते वाढली

मध्यप्रदेशात भाजपाची ७ टक्के मते वाढलीभोपाळ, (०४ डिसेंबर) – मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपाने ४८.५५ टक्के मते मिळवून नेत्रदीपक विजय मिळवला. २०१८ मधील निवडणुकीच्या तुलनेत भाजपाची मते यावेळी  सात टक्क्यांनी वाढली आहेत. त्यामुळे राज्याच्या द्वि-ध्रुवीय राजकारणात भाजपाची स्थिती मजबूत झाली आहे. २०१८ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला ४१.०२ टक्के मते मिळाली होती. मध्यप्रदेशात भाजपाने रविवारी दोन-तृतीयांश बहुमतांपर्यंत मजल मारली आणि २३० पैकी १६३ जागा जिंकल्या. दुसर्‍या क्रमांकावरील काँग्रेसला ६६ जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसच्या मतांची टक्केवारी मागील...4 Dec 2023 / No Comment / Read More »

मध्यप्रदेशात ‘भारत जोडो’ ठरली प्रभावहीन

मध्यप्रदेशात ‘भारत जोडो’ ठरली प्रभावहीन– यात्रेच्या मार्गावरील २१ पैकी १७ मतदारसंघांत भाजपा, भोपाळ, (०४ डिसेंबर) – काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी काढलेली भारत जोडो यात्रा मध्यप्रदेशात प्रभावहीन ठरल्याचे दिसून आले. भारत जोडो यात्रा ज्या मतदारसंघांतून गेली त्या २१ पैकी १७ मतदारसंघांत भाजपाचा विजय झाला आहे. भाजपाने रविवारी झालेल्या मतमोजणीत भाजपाने दोन तृतीयांश बहुमतापर्यंत मजल मारत २३० पैकी १६३ जागांवर विजय मिळवला. दुसऱ्या क्रमांकावरील काँग्रेसला ६६ जागांवर समाधान मानावे लागले. मागील वर्षी २३ नोव्हेंबर ते...4 Dec 2023 / No Comment / Read More »

उत्तर भारत भाजपाच्या कावेत; काँग्रेस हद्दपार

उत्तर भारत भाजपाच्या कावेत; काँग्रेस हद्दपारनवी दिल्ली, (०३ डिसेंबर) – मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसचा दारूण पराभव झाला. मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये अपेक्षा असतानाही काँग्रेसला जनतेने नाकारले. त्यामुळे १९८० नंतर पहिल्यांदाच उत्तर भारतातील हिंदी पट्ट्यात काँग्रेसच्या हाती सत्ता राहिलेली नाही. हा हिंदी पट्टा काँग्रेसच्या हातून निसटला आहे. मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसच्या पराभवाची सर्वाधिक चर्चा होत आहे. पक्षाच्या अंतर्गत अहवालात या राज्यांमध्ये विजयाचा दावा करण्यात आला होता. खुद्द राहुल गांधींनी मध्यप्रदेशात १३५ जागा मिळण्याचा दावा केला...3 Dec 2023 / No Comment / Read More »

मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजप

मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपनवी दिल्ली, (०३ डिसेंबर) – चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी रविवारी जाहीर झालेल्या मतमोजणीच्या ट्रेंडमध्ये मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भारतीय जनता पक्ष (भाजप) तर तेलंगणामध्ये काँग्रेस आघाडीवर आहे. छत्तीसगड, राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट लढत आहे आणि दक्षिणेकडील तेलंगणा राज्यात भारत राष्ट्र समिती आणि काँग्रेस आमनेसामने आहेत. पाचव्या राज्य मिझोराममध्ये सोमवारी मतमोजणी होणार आहे. पाच राज्यांमध्ये लोकसभेच्या ८४ जागा असून आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी विधानसभा निवडणुकीची ही शेवटची...3 Dec 2023 / No Comment / Read More »

प्रत्येक बहिणीला लाडली बहनाच्या माध्यमातून लक्षाधीश बनविणार

प्रत्येक बहिणीला लाडली बहनाच्या माध्यमातून लक्षाधीश बनविणार– भाऊबिजेनिमित्त शिवराजसिंह चौहान यांनी केली घोषणा, भोपाळ, (१६ नोव्हेंबर) – मध्यप्रदेशातील प्रत्येक बहिणीला लाडली बहना, महिला बचत गटांच्या माध्यमातून लक्षाधीश बनविणार असल्याचा निर्धार मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी व्यक्त केला. चौहान यांच्या निवासस्थानी बुधवारी भाऊबीज कार्यक्रम आयोजित केला होता. महिलांनी मुख्यमंत्र्यांना औक्षण केले तसेच त्यांच्या विजयाची कामना व्यक्त केली. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमही पार पडला. शिवराजसिंह चौहान म्हणाले की, राज्य सरकारच्या वतीने प्रत्येक बहिणीला लक्षाधीश बनविण्याचा निर्धार करण्यात आला आहे. घरातील...16 Nov 2023 / No Comment / Read More »

मध्यप्रदेश-छत्तीसगडमध्ये शुक्रवारी मतदान; प्रचाराच्या तोफा थंडावल्या

मध्यप्रदेश-छत्तीसगडमध्ये शुक्रवारी मतदान; प्रचाराच्या तोफा थंडावल्यानवी दिल्ली, (१५ नोव्हेंबर) – छत्तीसगड आणि मध्यप्रदेशात बुधवारी सायंकाळी ६ वाजता निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या. छत्तीसगडमध्ये दुसर्या टप्प्यातील आणि मध्यप्रदेशात एकमेव टप्प्यातील मतदान शुक्रवारी होणार आहे. या दोन्ही राज्यांमध्ये भाजप आणि काँग्रेसच्या दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी मध्यप्रदेशात जोरदार प्रचार केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यप्रदेशात भाजपाच्या प्रचाराचे सूत्र सांभाळले होते. भाजपाच्या बाजूने वातावरण निर्माण करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केल्यानंतर मोदी यांनी झारखंडमध्येही जोरदार प्रचार...15 Nov 2023 / No Comment / Read More »