किमान तापमान : 24.99° से.
कमाल तापमान : 25.33° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 65 %
वायू वेग : 2.06 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
24.24°से. - 27.77°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर घनघोर बादल24.63°से. - 28.19°से.
रविवार, 24 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.58°से. - 28.88°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.85°से. - 29.25°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.25°से. - 28.36°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर घनघोर बादल23.83°से. - 29.02°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर टूटे हुए बादलभोपाळ, (०४ डिसेंबर) – मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपाने ४८.५५ टक्के मते मिळवून नेत्रदीपक विजय मिळवला. २०१८ मधील निवडणुकीच्या तुलनेत भाजपाची मते यावेळी सात टक्क्यांनी वाढली आहेत. त्यामुळे राज्याच्या द्वि-ध्रुवीय राजकारणात भाजपाची स्थिती मजबूत झाली आहे.
२०१८ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला ४१.०२ टक्के मते मिळाली होती. मध्यप्रदेशात भाजपाने रविवारी दोन-तृतीयांश बहुमतांपर्यंत मजल मारली आणि २३० पैकी १६३ जागा जिंकल्या. दुसर्या क्रमांकावरील काँग्रेसला ६६ जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसच्या मतांची टक्केवारी मागील विधानसभा निवडणुकीइतकीच आहे. यावेळी काँग्रेसला ४०.४० टक्के मते मिळाली. मागील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला ४०.८९ टक्के मते मिळाली होती. मात्र, यावेळी काँग्रेस ११४ जागांवरून घसरून ६६ जागांवर आली आहे.
२००३ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला ४२.५० टक्के मते मिळाली आणि हा पक्ष १७३ जागांवर जिंकून आला होता. त्यावेळी काँग्रेसला केवळ ३८ जागा जिंकता आल्या. या पक्षाला ३१.६ टक्के मते मिळाली होती. २०१३ मध्ये भाजपाने ४४.८८ टक्के मतांसह १६५ जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसला ३६.३८ टक्के मतांसह ५८ जागांवर समाधान मानावे लागले होते. २०१८ मध्ये भाजपाला ४१.०२ टक्के मते मिळाली आणि या पक्षाने १०९ जागा जिंकल्या होत्या. त्यावेळी शर्यतीत अव्वल स्थानी असलेल्या काँग्रेसला ४०.८९ टक्के मते मिळाली आणि ११४ जागांवर विजय मिळाला होता.
मध्यप्रदेशात भाजपाचा लाखभर मतांनी सर्वांत मोठा विजय
मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपाचे इंदूर-२ येथील उमेदवार रमेश मेंडोला यांनी सर्वांत मोठा म्हणजे १,०७,०४७ मतांनी विजय मिळवला आहे. दुसरीकडे याच पक्षाचे शाजापूर येथील उमेदवार अरुण भीमावाड यांनी सर्वांत कमी म्हणजे २८ मतांनी विजय मिळवला.
मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि भाजपाच्या महिला उमेदवार कृष्णा गौर यांनीही एक लाख मतांपेक्षा जास्त मताधिक्याने विजय मिळवला. इंदूर-२ विधानसभा मतदारसंघात मेंडोला यांना १,६९,०७१ मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी व काँग्रेसचे उमेदवार चिंटू चौकसे यांना ६२,०२४ मते मिळाली. गोविंदपुरा मतदारसंघातील भाजपाच्या उमेदवार कृष्णा गौर यांनी १,०६,६६८ मतांनी काँग्रेसचे उमेदवार रवींद्र साहू यांचा पराभव केला. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी आपला पारंपरिक मतदारसंघ बुधनी येथून सलग सहाव्यांदा विजय मिळवला. काँग्रेसचे उमेदवार विक्रम शर्मा यांचा त्यांनी १,०४,९७४ मतांनी पराभव केला, अशी माहिती निवडणूक आयोगाच्या अधिकार्यांनी दिली. भाजपाचे रामेश्वर शर्मा त्यांचा पारंपरिक मतदारसंघ हुझूर येथून ९७,९१० मतांनी विजयी झाले.
भाजपाचे वरिष्ठ नेते गोपाल भार्गव यांनी नवव्यांदा विजय मिळवला. त्यांनी प्रतिस्पध्र्याचा ७२,८०० मतांनी पराभव केला. विशेष म्हणजे, ते प्रचार न करता निवडून येतात. ती परंपरा त्यांनी कायम ठेवली आहे. इंदूर-४ मतदारसंघातून भाजपाच्या मालिनी गौड ६९,८३७ मतांनी विजयी झाल्या. यापूर्वी या मतदारसंघात त्याचे पती आणि दिवंगत माजी मंत्री लक्ष्मणसिंह गौड विजयी झाले होते.
छत्तीसगडमध्ये मोठा विजय ६७ हजार मतांचा
रायपूर – छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बृजमोहम अग्रवाल यांनी दक्षिण रायपूर मतदारसंघातून सर्वाधिक ६७,७१९ मतांच्या फरकाने काँग्रेसच्या प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवला. कांकेर विधानसभा मतदारसंघात भाजपाचे उमेदवार आशाराम नेताम यांनी केवळ १६ मतांच्या फरकाने प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवला.
अग्रवाल सलग आठव्यांदा आमदार झाले. ते १९९० पासून अपराजित आहेत. त्यांना १,०९२६३, तर काँग्रेसचे महंत रामसुंदर दास यांना ४१,५४४ मते मिळाली. छत्तीसगडमधील ९० जागांपैकी ५४ जागांवर विजय मिळवत रविवारी भाजपाने काँग्रेसकडून सत्ता हिसकावली. काँग्रेसला ३५ जागांवर समाधान मानावे लागले. मागील निवडणुकीत काँग्रेसने ६८ जागा पटकावल्या होत्या. या निवडणुकीत गोंडवाना गणतंत्र पार्टीला एक जागा मिळाली आहे.
अग्रवाल यांच्या उंचीचा एकही नेता काँग्रेसकडे रायपुरात नाही. अग्रवाल यांनी आपला मतदारसंघ व्यवस्थित सांभाळला आहे. ते कायम मतदारांच्या संपर्कात असतात. नवनिर्वाचित ९० सदस्यीय विधानसभेतील ओ. पी. चौधरी हे एकमेव नेते आहेत, ज्यांनी ५० हजार मतांच्या फरकाने विजय मिळवला आहे. या निवडणुकीत राज्यातील इतर उमेदवारांच्या तुलनेत भाजपाचे विजय शर्मा यांना सर्वाधिक १,४४,२५७ मते मिळाली. शर्मा यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री मोहम्मद अकबर यांना कावर्धा मतदारसंघातून ३९,५९२ मतांनी पराभूत केले. भाजपाचे आशाराम नेताम यांनी केवळ १६ मतांनी काँग्रेसचे उमेदवार शंकर ध्रुव यांचा पराभव केला. नेताम पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांना ६७,९८०, तर ध्रुव यांना ६७,९६४ मते मिळाली.
उपमुख्यमंत्री सिंह देव ९४ मतांनी पराभूत
काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री सिंह देव हे अंबिकापूर विधानसभा मतदारसंघातून त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपाचे राजेश अग्रवाल यांच्याकडून केवळ ९४ मतांनी पराभूत झाले. सिंह देव यांना ९०,६८६ मते, तर अग्रवाल यांना ९०,७८० मते मिळाली. इतकेच नव्हे तर, छत्तीसगडमध्ये आठ मंत्र्यांना पराभवाची चव चाखावी लागली. यात गृहमंत्री ताम्रध्वज साहू यांचाही समावेश आहे.