किमान तापमान : 24.02° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 51 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.02° से.
23.64°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.63°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलजयपूर, (०४ डिसेंबर) – राजस्थानच्या उदयपूर मतदारसंघात विधानसभा निवडणुकीत जोरदार चुरस पाहायला मिळाली. पेपरफुटी, भ्रष्टाचार, तुष्टीकरण या सर्व मुद्द्यांसह भाजपाने कन्हैयालाल हत्याकांडातून काँग्रेसच्या काळात गुन्हेगारीचा मुद्दाही उपस्थित केला होता. कन्हैयालाल हत्याकांडप्रकरणी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले होते. येथून भाजपने चांगल्या फरकाने विजय मिळवला. ताराचंद जैन यांनी या जागेवर विजयाचा झेंडा फडकवला आहे. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार गौरव वल्लभ यांचा ३२ हजारांहून अधिक मतांनी पराभव केला आहे. भारतीय आदिवासी पक्षाचे उमेदवार तुलसी राम गमेती तिसर्या स्थानावर आहेत. तर आम आदमी पक्षाचे उमेदवार मनोज लबाना हे केवळ ५०० मतांपर्यंत मर्यादित होते. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी वातावरण तयार झाले आहे.
त्याचवेळी भारतीय जनता पाक्षाने (भाजप) रविवारी मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसला दारूण पराभव करून हिंदी भाषिक राज्यांमध्ये आपली पकड मजबूत केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व अधिक बळकट करण्यासाठी आणि २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी वातावरण तयार करण्यासाठी विधानसभा निवडणुकीच्या निकालांचा विचार केला जात आहे. राजस्थान आणि छत्तीसगडमधील पराभव आणि भाजपच्या लाटेत, विरोधी पक्षाने (काँग्रेस) तेलंगणातील सत्ताधारी भारत राष्ट्र समिती ला सत्तेतून बेदखल केले. अशा प्रकारे, लोकसभा निवडणुकीची सेमीफायनल म्हणून ओळखल्या जाणार्या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपने ३-१ असा विजय मिळवून चमकदार कामगिरी केली आहे.