किमान तापमान : 27.87° से.
कमाल तापमान : 27.99° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 51 %
वायू वेग : 3.54 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
27.87°से. - 30.57°से.
शुक्रवार, 15 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.82°से. - 30.41°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.75°से. - 30.46°से.
रविवार, 17 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.9°से. - 31.02°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर साफ आकाश27.09°से. - 30.05°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.49°से. - 30.08°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश– यात्रेच्या मार्गावरील २१ पैकी १७ मतदारसंघांत भाजपा,
भोपाळ, (०४ डिसेंबर) – काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी काढलेली भारत जोडो यात्रा मध्यप्रदेशात प्रभावहीन ठरल्याचे दिसून आले. भारत जोडो यात्रा ज्या मतदारसंघांतून गेली त्या २१ पैकी १७ मतदारसंघांत भाजपाचा विजय झाला आहे.
भाजपाने रविवारी झालेल्या मतमोजणीत भाजपाने दोन तृतीयांश बहुमतापर्यंत मजल मारत २३० पैकी १६३ जागांवर विजय मिळवला. दुसऱ्या क्रमांकावरील काँग्रेसला ६६ जागांवर समाधान मानावे लागले. मागील वर्षी २३ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर या कालावधीत भारत जोडो यात्रेने मध्यप्रदेशातील माळवा-निमार क्षेत्रातील सहा जिल्ह्यांमधून ३८० किमी प्रवास केला. ही यात्रा बऱ्हाणपूर, खंडवा, खरगोन, इंदूर, उज्जैन आणि आगर माळवातून गेली. या परिसरात २१ मतदारसंघ आहेत. २०१८ मध्ये भाजपाने येथे १४ जागा जिंकल्या होत्या, तर काँग्रेसने सात जागा जिंकल्या होत्या. यंदा भाजपाने तीन जागा जास्त qजकत १७ वर उडी घेतली. मात्र, काँग्रेसची घसरण होऊन चार जागांवर आली.
बऱ्हाणपूर जिल्ह्यातील नेपानगर मतदारसंघातून भाजपाच्या मंजू दादू आणि बऱ्हाणपूर मतदारसंघातून अर्चना चिटणीस विजयी झाल्या. बऱ्हाणपूर मतदारसंघात २०१८ मध्ये अपक्ष उमेदवार सुरेंद्रसिंह शेरा विजयी झाले होते. यंदा काँग्रेसने त्यांना तिकीट दिले होते. २०१८ मध्ये काँग्रेसच्या सुमित्रा कासदेकर नेपानगरमधून विजयी झाल्या होत्या. मात्र, त्यांनी भाजपात प्रवेश केला आणि २०२० च्या पोटनिवडणुकीत जिंकल्या. भाजपाने ही जागा राखली आहे.