किमान तापमान : 28.22° से.
कमाल तापमान : 30.99° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 35 %
वायू वेग : 2.56 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
30.99° से.
23.84°से. - 30.99°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.33°से. - 27.74°से.
रविवार, 24 नोव्हेंबर घनघोर बादल24.61°से. - 28.54°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.91°से. - 28.49°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर कुछ बादल25.02°से. - 28.97°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.45°से. - 28.82°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर घनघोर बादलनवी दिल्ली, (०५ डिसेंबर) – इंडि आघाडीची बुधवारी दिल्लीत होणारी बैठक अनेक प्रमुख नेत्यांच्या अनुपस्थितीमुळे पुढे ढकलण्यात आली. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यासह आघाडीतील काही प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता नसल्याच्या वृत्तानंतर बैठक रद्द करण्यात आली. पुढील बैठक १८ डिसेंबरला होणार असल्याची माहिती आहे.
चार राज्यांमधील विधानसभा निवडणूक निकाल जाहीर होताच भाजपाविरोधी इंडिया आघाडीने ६ डिसेंबर रोजी बैठक बोलवली होती. काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे यांनी इंडिया आघाडीतील २८ पक्षांच्या नेत्यांना दिल्लीत बैठकीसाठी निमंत्रण दिले. या बैठकीत पाच राज्यांमधील निवडणूक निकालावर चर्चा केली जाणार होती. मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, मिझोरम, तेलंगणातील विधानसभा निवडणूक निकाल जाहीर झाले आहेत. यानंतर ६ डिसेंबर रोजी इंडिया आघाडीची बैठक होणार होती. नितीशकुमार, ममता बॅनर्जी आणि झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यासह प्रमुख नेत्यांनी उपस्थित राहू शकणार नसल्याचे कळवल्याने इंडिया आघाडीची बैठक पुढे ढकलली आहे.
इंडिया आघाडीची पहिली बैठक २३ जून रोजी पाटणा येथे झाली होती. यावेळी निमंत्रक नितीशकुमार होते. १५ पक्षांचे प्रमुख या बैठकीला उपस्थित होते. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधी पक्षांच्या ऐक्यावर चर्चा झाली. यानंतर १७ आणि १८ जुलै रोजी येथे विरोधी पक्षांच्या ऐक्याची दुसरी बैठक झाली. त्यात २६ पक्ष सहभागी झाले होते. या बैठकीत विरोधी पक्षांच्या आघाडीचे नाव ‘इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुसिव्ह अलायन्स’ अर्थात् इंडिया असे ठेवण्यात आले होते.
इंडिया आघाडीची शेवटची आणि तिसरी बैठक ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी मुंबईत झाली. यावेळी इंडिया आघाडीने प्रचार समिती, रणनीती समिती, मीडिया, सोशल मीडिया आणि संशोधन अशा पाच समितींची स्थापना केली होती. या बैठकीत २८ विरोधी पक्षांनी पाच राज्यांमध्ये होणार्या निवडणुकीची रणनीतीवरही चर्चा केली होती.