किमान तापमान : 24.05° से.
कमाल तापमान : 24.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 57 %
वायू वेग : 6.18 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
23.71°से. - 24.99°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.37°से. - 25.6°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.45°से. - 26.84°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश23.9°से. - 25.67°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.94°से. - 25.02°से.
गुरुवार, 16 जानेवारी घनघोर बादल23.69°से. - 26.74°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादल– चिप असलेली मशिन हॅक करणे शक्य : दिग्विजयसिंह,
भोपाळ, (०५ डिसेंबर) – चिप असलेले कोणतेही मशिन हॅक केले जाऊ शकते, असा दावा करीत काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिग्विजसिंह यांनी मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या पराभवाचे खापर अपेक्षेप्रमाणे इव्हीएमवर फोडले आहे. मी २००३ पासून इव्हीएमद्वारे मतदानाला विरोध करीत असल्याचे त्यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले.
चीप असलेले कोणतेही मशीन हॅक केले जाऊ शकते. मी २००३ पासून ईव्हीएमद्वारे मतदानाला विरोध करीत आहे. आपण आपल्या भारतीय लोकशाहीला ‘प्रोफेशनल’ नियंत्रित करू देऊ शकतो का, हा मूलभूत प्रश्न आहे; ज्याकडे सर्व राजकीय पक्षांनी लक्ष देणे आवश्यक आहे. निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालय तुम्ही कृपया आमच्या भारतीय लोकशाहीचे रक्षण कराल का, असे सिंह यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. दरम्यान, त्यांनी केलेला आरोप मध्यप्रदेश भाजपाने फेटाळला असून, धोरणे अपयशी ठरल्याने काँग्रेसचा पराभव झाला. आता खापर इव्हीएमवर फोडले जात आहे, अशी टीका भाजपाने केली.
सिंह यांनी एक्सवर एका थ्रेडचा उल्लेख केला आहे, ज्यात रवी नायर नावाच्या पत्रकाराने इव्हीएम कसे अचूक आणि लोकशाहीसाठी सुरक्षित नाहीत, हे स्पष्ट केले आहे. जोपर्यंत प्रत्येक स्लिपची मोजणी होत नाही, तोपर्यंत इव्हीएम सुरक्षित साधन नाही. अनेक लोकांचा असा विश्वास आहे की, इव्हीएममध्ये मोठ्या प्रमाणात छेडछाड करणे शक्य नाही. तथापि, ३ ते ३.५ टक्के छेडछाड केलेल्या इव्हीएममुळे निकालात मोठा बदल होतो आणि यामुळे कोणताही राजकीय पक्ष निवडणूक जिंकेल, असे नायर यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.