किमान तापमान : 27.87° से.
कमाल तापमान : 27.99° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 51 %
वायू वेग : 3.54 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
27.82°से. - 30.57°से.
शुक्रवार, 15 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.82°से. - 30.41°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.75°से. - 30.46°से.
रविवार, 17 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.9°से. - 31.02°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर साफ आकाश27.09°से. - 30.05°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.49°से. - 30.08°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश– जर्नेलसिंग भिंद्रानवालेचा होता पुतण्या,
नवी दिल्ली, (०५ डिसेंबर) – खलिस्तानी अतिरेकी लखबीरसिंग रोडेचा पाकिस्तानात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. तो प्रतिबंधित खलिस्तान लिबरेशन फोर्स आणि इंटरनॅशनल शीख युथ फेडरेशनचा स्वयंघोषित अध्यक्ष होता.
ऑपरेशन ब्ल्यू स्टारमध्ये मारला गेलेला अतिरेकी जरनेलसिंग भिंद्रावालेचा तो पुतण्या होता तसेच भारताच्या अतिरेक्यांच्या यादीत त्याचे नाव होते. लखबीरसिंग रोडेच्या मृत्यूच्या वृत्ताला त्याचा भाऊ आणि अकाल तख्तचे माजी जत्थेदार जसबीरसिंग रोडे यांनी दुजोरा दिला. पाकिस्तानात त्याचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची माहिती त्याच्या मुलाने दिल्याचे जसबीरसिंग रोडे यांनी सांगितले. त्याच्यावर पाकिस्तानात अन्त्यसंस्कार करण्यात आला. लखबीरसिंग रोडेला मधुमेह झाला होता. त्याची पत्नी, दोन मुले आणि मुलगी कॅनडात आहे.
भारतातून काढला होता पळ
लखबीरसिंग रोडे पंजाबच्या मोगा जिल्ह्यातील रहिवासी होता आणि भारतातून पळ काढल्यानंतर तो पहिले दुबई आणि नंतर पाकिस्तानात गेला होता. मात्र, त्याने आपल्या कुटुंबाला कॅनडात ठेवले होते.
प्रत्यार्पणाच्या यादीत होते नाव
भारताने प्रत्यार्पणाची मागणी करीत २००२ मध्ये २० अतिरेक्यांची यादी पाकिस्तानला सोपवली होती. या यादीत लखबीरसिंग रोडेचे नाव होते. भारताने पाकिस्तानला दिलेल्या पुराव्यांनुसार त्याने इंटरनॅशनल शीक युथ फेडरेशनच्या ब्रिटन, जर्मनी, कॅनडा आणि अमेरिकेसह कित्येक देशांत शाखा उघडल्या होत्या.
भारतातील अनेक हल्ल्यांचा सूत्रधार
स्थानिक गुंडांच्या टोळ्यांची मदत घेत त्याने पंजाबमध्ये कित्येक हल्ले घडवल्याचा आरोप आहे. या वर्षाच्या सुरुवातीला एनआयएने त्याची मोगा जिल्ह्यातील एक एकर जमीन जप्त केली. १५ सप्टेंबर २०२१ रोजी पंजाबच्या फाजिल्का जिल्ह्यात झालेल्या टिफिन बॉम्ब स्फोटात त्याचा हात असल्याचे एनआयए तपासात निष्पन्न झाले. पंजाबमध्ये शस्त्रास्त्रे, दारुगोळा, मादकपदार्थ आणि टिफिन बॉम्ब तस्करीच्या माध्यमातून पाठवण्यात त्याची महत्त्वाची भूमिका होती. २०२१ ते २०२३ या कालावधीत लखबीरसिंग रोडे सहा दहशतवादी हल्ल्यांत सहभाग असल्याचे आढळले.