किमान तापमान : 28.58° से.
कमाल तापमान : 29.99° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 37 %
वायू वेग : 3.2 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
29.99° से.
25.84°से. - 30.87°से.
शुक्रवार, 15 नोव्हेंबर घनघोर बादल27.21°से. - 30.97°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.35°से. - 30.7°से.
रविवार, 17 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.27°से. - 30.86°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.52°से. - 31.46°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.53°से. - 30.46°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश– केंद्रीय गृहमंत्रालयाच्या भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्राची शिफारस,
नवी दिल्ली, (०६ डिसेंबर) – आर्थिक गुन्ह्यांशी निगडीत संघटित बेकायदेशीर गुंतवणूक आणि नेमून दिलेल्या कार्यावर आधारित अर्धवेळ नोकरी देण्यात गुंतलेल्या १०० पेक्षा जास्त संकेतस्थळांवर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. ही संकेतस्थळे विदेशातील लोकांकडून चालवली जात होती आणि अर्धवेळ नोकरीच्या शोधात असलेले तरुण, सेवानिवृत्त, महिला आणि बेरोजगारांना लक्ष्य करायचे, असे जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
केंद्रीय गृहमंत्रालयाचा भाग असलेल्या भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्राच्या (आय४सी) राष्ट्रीय सायबर गुन्हे धोके विश्लेषण पथकाने (एनसीटीएयू) मागील आठवड्यात या संकेतस्थळांची ओळख पटवून त्यावर बंदी घालण्याची शिफारस केली होती. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने माहिती तंत्रज्ञान कायदा-२००० अंतर्गत या संकेतस्थळांवर बंदी घातली, असे निवेदनात म्हटले आहे. आर्थिक गुन्ह्यांशी संबंधित टास्क आधारित संघटित बेकायदेशीर गुंतवणुकीची सुविधा देणारी ही संकेतस्थळे विदेशी लोकांद्वारे चालवल्या जातात आणि डिजिटल जाहिराती, चॅट मॅसेंजर आणि भाड्याने दिलेली खाती वापरत असल्याचे समोर आले.
कार्ड नेटवर्क, क्रिप्टो करन्सी, विदेशातील एटीएममधून रक्कम काढून आणि आंतरराष्ट्रीय फिनटेक कंपन्यांचा वापर करून आर्थिक फसवणुकीतून मिळालेली रक्कम मोठ्या प्रमाणात भारताबाहेर पळवली जात आहे. एनआरसीपीच्या हेल्पलाईनवर अशा प्रकारच्या १९३० तक‘ारी आल्या होत्या आणि हे गुन्हे नागरिकांसाठी धोका आहे तसेच डाटा सुरक्षेचाही प्रश्न यात असल्याचे निवेदनात म्हटले आहे.