किमान तापमान : 23.32° से.
कमाल तापमान : 23.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 46 %
वायू वेग : 4.32 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.99° से.
22.49°से. - 25.53°से.
रविवार, 12 जानेवारी साफ आकाश23.62°से. - 27.14°से.
सोमवार, 13 जानेवारी कुछ बादल24.17°से. - 25.97°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश24.12°से. - 25.55°से.
बुधवार, 15 जानेवारी छितरे हुए बादल23.64°से. - 26°से.
गुरुवार, 16 जानेवारी छितरे हुए बादल24.67°से. - 27.56°से.
शुक्रवार, 17 जानेवारी टूटे हुए बादलनवी दिल्ली, (१५ नोव्हेंबर) – छत्तीसगड आणि मध्यप्रदेशात बुधवारी सायंकाळी ६ वाजता निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या. छत्तीसगडमध्ये दुसर्या टप्प्यातील आणि मध्यप्रदेशात एकमेव टप्प्यातील मतदान शुक्रवारी होणार आहे. या दोन्ही राज्यांमध्ये भाजप आणि काँग्रेसच्या दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी मध्यप्रदेशात जोरदार प्रचार केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यप्रदेशात भाजपाच्या प्रचाराचे सूत्र सांभाळले होते. भाजपाच्या बाजूने वातावरण निर्माण करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केल्यानंतर मोदी यांनी झारखंडमध्येही जोरदार प्रचार केला.
मध्यप्रदेशात अनुसूचित जमातीच्या ४७ जागा आहेत. मागील तीन निवडणुकांची आकडेवारी पाहिली तर आदिवासींनी ज्या पक्षाला साथ दिली, त्याच पक्षाने सरकार स्थापन केल्याचे स्पष्ट दिसून आले. २००८ आणि २०१३ मध्ये भाजपाने सर्वाधिक २९ आणि ३१ जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे भाजापचा मार्ग सुकर झाला. २०१८ मध्ये काँग्रेसने एसटीसाठी राखीव असलेल्या ३० जागांवर कब्जा केला आणि भाजपला फक्त १६ जागांवर यश मिळाले. परिणामी, सत्ता काँग्रेसच्या हातात गेली. पण, नंतर काँग्रेसमधील मतभेदाचा फायदा घेत भाजपाने सरकार स्थापन केले.
छत्तीसगडमध्येही आदिवासींची महत्त्वाची भूमिका
छत्तीसगडमध्येही आदिवासींची लोकसंख्या मोठी आहे. राज्यातील विधानसभेच्या ९० जागांपैकी २९ जागा राखीव आहेत. २००८ आणि २०१३ मध्ये भाजपने १९ आणि ११ जागा जिंकल्या होत्या. २०१८ मध्ये काँग्रेसने यापैकी २५ जागांवर कब्जा केल्यावर त्यांनी सत्ता मिळवली.