किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलरायपूर, (२१ ऑक्टोबर) – छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त मोहला-मानपूर-अंबागड चौकी जिल्ह्यातील एका दुर्गम गावात अज्ञात हल्लेखोरांनी बिरजू ताराम या भाजपा कार्यकर्त्याची गोळ्या झाडून हत्या केली. सरखेडा गावात सायंकाळी बिरजू ताराम फिरायला जात असताना ही घटना घडली. या घटनेत नक्षलवाद्यांचा हात आहे का, असे विचारले असता, अद्याप कोणताही निष्कर्ष काढणे खूप घाईचे होईल, तपास सुरू आहे, असे जिल्हा पोलिस अधीक्षक रत्ना सिंह यांनी सांगितले.
प्रत्यक्षदर्शींच्या मते, तारामवर दोन-तीन लोकांनी गोळीबार केला. या हल्ल्यात तो जागीच ठार झाला. दोन टप्प्यातील विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ७ नोव्हेंबरला मतदान होत असलेल्या २० मतदारसंघांमध्ये मोहला-मानपूरचा समावेश आहे. या घटनेबद्दल संताप व्यक्त करताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष अरुण साओ म्हणाले की, ही घटना ताराम यांना लक्ष्य करून घडवून आणली आहे. पक्षाचे कार्यकर्ते अशा घटनांनी घाबरणार नाहीत आणि ते काँग्रेसला सत्तेवरून उखडून फेकतील. यापूर्वी जूनमध्ये विजापूर जिल्ह्यात भाजपाच्या एका स्थानिक नेत्याची नक्षलवाद्यांनी हत्या केली होती. फेब्रुवारीत बस्तर विभागातील विजापूर येथे एक आणि शेजारच्या नारायणपूर जिल्ह्यात दोन भाजपा नेत्यांची हत्या करण्यात आली होती.