किमान तापमान : 24.74° से.
कमाल तापमान : 24.99° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 5.97 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
23.55°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.63°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल– तामिळनाडू उच्च न्यायालयाने प्रतिपादन,
– राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला ३५ मार्गावर पथसंचलनाची परवानगी,
चेन्नई, (२० ऑक्टोबर) – राष्ट्रीय स्वयंसेवक संघ दसर्याच्या दिवशी देशभरात पथसंचलनाचे आयोजन करते, पण तामिळनाडू सरकारने यासाठी परवानगी नाकारली होती. रॅलीच्या मार्गावर मशिदी आणि चर्च आहेत, असे कारण यासाठी देण्यात आले होते. मात्र, तामिळनाडू सरकारचा हा निर्णय घटनेतील धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वाविरोधात आहे, असे मत तामिळनाडू उच्च न्यायालयाने नोंदवले तसेच पोलिसांनी २२ आणि २९ ऑक्टोबरला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला ३५ मार्गावर पथसंचलन आयोजित करण्याची परवानगी द्यावी, अशा सूचनाही दिल्या.
न्य. जी. जयचंद्रन यांनी हा निकाल दिला. अशा प्रकारे परवानगी न देणे प्रशासनाच्या धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही तत्त्वांच्या विरोधात आहे. संघ विचारांच्या विरोधात असलेल्या विचारधारांच्या धर्मांची प्रार्थनास्थळे आणि संघटनांची कार्यालये मार्गावर आहेत, हे कारण देऊन पथसंचलनाला परवानगी नाकारणे भारतीय घटनेच्या विरोधात आहे, असे न्यायालयाने नमूद केले. हा निकाल १६ ऑक्टोबरला देण्यात आला. संघाच्या पदाधिकार्यांनी पथसंचलनासाठी परवानगी मागणारे अर्ज केले होते, पण या मार्गात मंदिर, मशिदी तसेच द्रमुक पक्षाची कार्यालये आहेत, असे कारण देऊन परवानगी देण्यात आली नव्हती. मार्गावर वाहतूक कोंडी होईल, असेही कारण देण्यात आले होते. या रॅली आणि सभा शांतेत झाल्या पाहिजेत, अशी अट न्यायालयाने घातली आह. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात संघाने गांधी जयंतीनिमित्त सार्वजनिक सभा आणि रॅलीचे आयोजन करण्याची परवानगी मागितली होती. मात्र, कायदा व सुव्यवस्थेचे कारण देत परवानगी देण्यात आली नव्हती. संघाने याविरोधात मद्रास उच्च न्यायालयात दाद मागितली होती, त्यानंतर ही परवानगी देण्यात आली.
Short URL : https://vrittabharati.in/?p=56702