किमान तापमान : 22.78° से.
कमाल तापमान : 22.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 4.04 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.69°से. - 25.53°से.
रविवार, 12 जानेवारी साफ आकाश23.62°से. - 27.14°से.
सोमवार, 13 जानेवारी कुछ बादल24.17°से. - 25.97°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश24.11°से. - 25.55°से.
बुधवार, 15 जानेवारी छितरे हुए बादल23.64°से. - 26°से.
गुरुवार, 16 जानेवारी छितरे हुए बादल24.67°से. - 27.56°से.
शुक्रवार, 17 जानेवारी टूटे हुए बादल– २० विधानसभा मतदारसंघात ७ नोव्हेंबरला निवडणूक,
नवी दिल्ली, (०३ नोव्हेंबर) – छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ७ नोव्हेंबरला २० मतदारसंघात निवडणूक होणार आहे. येथील प्रचाराच्या तोफा रविवारी थंडावतील. माजी मुख्यमंत्री भाजपाचे डॉ. रमणसिंह तसेच प्रदेश काँग्रेस अध्यक्ष दीपक बैज यांच्यासह अनेकांचे भाग्य इव्हीएममध्ये बंद होणार आहे.
पहिल्या टप्प्यात बस्तर विभागाच्या १२, तर दुर्ग विभागाच्या आठ मतदारसंघांचा समावेश आहे. हा भाग काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. २०१८ मध्ये बस्तर विभागाच्या बारापैकी अकरा मतदारसंघांत काँग्रेस विजयी झाली होती. भानुप्रतापपूर मतदारसंघाची पोटनिवडणूकही भाजपाने जिंकली होती. दुर्ग विभागाच्या आठपैकी फक्त एका मतदारसंघात भाजपाला विजय मिळाला होता. बस्तर या नक्षलप्रभावित भागात प्रचारादरम्यान नक्षलवाद्यांनी पोलिसांचे खबरी असल्याच्या संशयावरून तिघांची हत्या केली.
दुर्गच्या राजनांदगाव मतदारसंघातून भाजपाचे माजी मुख्यमंत्री डॉ. रमणसिंह निवडणूक लढवत आहे. काँग्रेसच्या गिरीश देवांगण यांच्याशी त्यांची लढत आहे. या मतदारसंघातून सलग तीनवेळा रमणसिंह निवडणूक जिंकले. यावेळी चौथ्यांदा ते या मतदारसंघातून रिंगणात आहे. २००३ ते २०१८ अशी सलग पंधरा वर्षे डॉ. रमणसिंह यांनी छत्तीसगडचे मुख्यमंत्रिपद भूषवले. पहिल्या टप्प्यातील निवडणुकीच्या २० मतदारसंघात २२३ उमेदवार रिंगणात आहे. ४०,७८,६८१ मतदार ३०१४ मतदान केंद्रातून मतदानाचा हक्क बजावणार आहेत. पहिल्या टप्प्यात पुरुष मतदारांपेक्षा महिला मतदारांची संख्या जास्त आहे. ५ नोव्हेंबरला पहिल्या टप्प्यातील प्रचार संपणार आहे.