किमान तापमान : 27.87° से.
कमाल तापमान : 27.99° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 51 %
वायू वेग : 3.54 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
27.82°से. - 30.57°से.
शुक्रवार, 15 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.82°से. - 30.41°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.75°से. - 30.46°से.
रविवार, 17 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.9°से. - 31.02°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर साफ आकाश27.09°से. - 30.05°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.49°से. - 30.08°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाशनवी दिल्ली, (०३ नोव्हेंबर) – मिझोराम विधानसभेसाठी ७ नोव्हेंबरला एका टप्प्यात मतदान होणार आहे. राज्यात मिझो नॅशनल फ्रंट, जोरम पीपल्स मुव्हमेंट तसेच काँग्रेस अशी तिरंगी लढत असली, तरी भाजपा ही लढत चौरंगी करण्याच्या प्रयत्नात आहे. मिझो नॅशनल फ्रंट, जोरम पीपल्स मुव्हमेंट तसेच काँग्रेस राज्यातील सर्व म्हणजे ४० जागा लढवत आहे. भाजपाने आपले २३ उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. २०१८ मध्ये भाजपाने ३९ जागा लढवल्या होत्या. आम आदमी पक्षही चार जागा लढवत आहे. याशिवाय २७ अपक्ष उमेदवारही निवडणुकीच्या रिंगणात आहे. ५ नोव्हेंबरला राज्यातील प्रचार संपणार आहे.
सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेस वगळता अन्य कोणत्याही पक्षाशी आघाडी करण्याची घोषणा भाजपाने केली आहे. राज्यात सध्या मिझो नॅशनल फ्रंटची सत्ता असून, जोरम पीपल्स मुव्हमेंट प्रमुख विरोधी पक्ष आहे. २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत दहा वर्षांपासून सत्तेत असलेल्या काँग्रेसला पराभूत करून मिझो नॅशनल फ्रंट सत्तेत आली होती. विधानसभेच्या ४० जागांसाठी १७४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून ८ लाख ५६ हजार ८६८ मतदार आपला मतदानाचा अधिकार बजावणार आहे. ३ डिसेंबरला राज्यातील मतमोजणी होणार आहे.
ज्येष्ठ, दिव्यांगांसाठी घरून मतदानाची सुविधा
राज्यात ८० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या तसेच दिव्यांग नागरिकांसाठी घरून मतदान करण्याची सुविधा निवडणूक आयोगाने दिली आहे. त्यामुळे आतापर्यंत ५,३०६ ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग तसेच सरकारी अधिकार्यांनी आपला मतदानाचा अधिकार बजावला आहे. सरकारी अधिकार्यांनी पोस्टल बॅलेटच्या माध्यमातून मतदान केले. मागील निवडणुकीत राज्यात मिझो नॅशनल फ्रंटने २६, जोरम पीपल्स मुव्हमेंटने ७, तर काँग्रेसने पाच जागा जिंकल्या होत्या. भाजपाने एक जागा जिंकत आपले खाते उघडले होते.