किमान तापमान : 23.81° से.
कमाल तापमान : 24.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 44 %
वायू वेग : 4.88 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
23.71°से. - 24.99°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.37°से. - 25.6°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.45°से. - 26.84°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश23.9°से. - 25.67°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.94°से. - 25.02°से.
गुरुवार, 16 जानेवारी घनघोर बादल23.69°से. - 26.74°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादलजगदलपूर, (०४ नोव्हेंबर) – भाजपाने देशातील समस्त आदिवासींसोबत दुर्व्यवहार केला असून, त्यांना जंगल, जल आणि जमीन परत करावीच लागेल, असा इशारा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिला. छत्तीसगडमध्ये येत्या मंगळवारी पहिल्या टप्प्यातील मतदान होणार असून, राज्यात प्रचाराने जोर धरला आहे. भाजपा आणि काँग्रेसने मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमधील सभांना सर्वांत जास्त प्राधान्य दिल्याचे दिसून येते. राहुल गांधी यांनी शनिवारी जगदलपुरातील लालबाग मैदानात प्रचारसभेला संबोधित केले.
भाजपाने आदिवासी बांधवांसाठी वनवासी हा शब्द तयार केला आहे. त्यांना या बांधवांना जंगलातील जनावरांसारखी जागा द्यायची आहे. भाजपा नेता आदिवासींसोबत जनावरांसारखा व्यवहार करीत असले, तरी आदिवासी हा एक क्रांतिकारी शब्द आहे. या शब्दात मोठा अर्थ दडलेला आहे. कारण, तेच देशाचे प्रथम मालक आहे आणि ही बाब विसता येणार नाही. काँग्रेस पक्ष असा शब्द कोणत्याही परिस्थितीत स्वीकार नाही, असे राहुल गांधी म्हणाले.