किमान तापमान : 27.71° से.
कमाल तापमान : 27.99° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 51 %
वायू वेग : 4.28 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
27.87°से. - 30.66°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर घनघोर बादल27.54°से. - 30.53°से.
रविवार, 17 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.6°से. - 29.96°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.44°से. - 30.51°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.94°से. - 29.99°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.27°से. - 30.16°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश– नातेवाईकांचे हित साधल्याचाही आरोप,
शिवपुरी, (०४ नोव्हेंबर) – मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंंत्री तसेच काँग्रेसचे नेते कमलनाथ यांचा हात देशपातळीवरील आणि खुद्द त्यांच्या राज्यातील विविध घोटाळ्यांमध्ये आहे. त्यांनी मध्यप्रदेशाला आजारी केले, असा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शनिवारी केला आहे. शिवपुरी जिल्ह्यातील करैरा येथे आयोजित प्रचारसभेत अमित शाह यांनी कमलनाथ आणि राहुल गांधी या दोन्ही नेत्यांवर जोरदार टीका केली. सभेत नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य शिंदे प्रामुख्याने उपस्थित होते. कमलनाथ यांनी साडेतीनशे कोटी रुपयांचा मोजरबेअर घोटाळा केला असून, २, ४०० कोटींच्या अगुस्ता वेस्टलॅण्ड घोटाळ्यातही त्यांचे नाव आले आहे. याशिवाय ६०० कोटींचा इप्को आणि २५ हजार कोटी रुपयांच्या कर्जमाफी घोटाळ्यातही कमलनाथांचा सहभाग असल्याचे अमित शाह म्हणाले.
कमलनाथांनी मध्यप्रदेशात बरेच उद्योग केलेत. कमिशनबाजी करीत नातेवाईकांच्या कल्याणाचेही उद्योग त्यांनी केले. याशिवाय भ्रष्टाचाराचा उद्योगही उभा केला. त्यांनी शिवराजसिंह चौहान यांनी राबविलेल्या ५१ पेक्षा अधिक गरीब कल्याण योजना बंद केल्या. कमलनाथ यंदाच्या निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत सत्तेत येणार नसून, नशिबाने आल्यास शेतकर्यांना दिली जाणारी १२ हजारांची मदत बंद होण्याची शक्यता आहे. ‘लाड़ली बहना’ ही योजनाही बंद होऊ शकते, असेही अमित शाह यांनी स्पष्ट केले.
शिवराज सरकारचे कौतुक
विद्यमान भाजपा सरकारने गरीब, शोषित, वंचितांच्या कल्याणासाठी काम केले आहे. २००३ साली राज्याचे बजेट २३ हजार कोटी रुपयांचे होते. हाच आकडा यंदा तीन लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक होता. काँग्रेस सरकारच्या सत्तेत वैद्यकीय जागांची संख्या ६२० होती, ती चार हजारांवर पोहोचली आहे. आयआयटीच्या जागाही वाढल्या आहेत. राज्यात येणार्या पर्यटकांची संख्या ६४ लाखांवरून थेट नऊ कोटींवर गेली असल्याचे सांगत अमित शाह यांनी शिवराजसिंह चौहान सरकारचे कौतुक केले.